Breaking News

1/breakingnews/recent

2 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट

No comments

     News24सह्याद्री - राम मंदिराच्या वर्गणीसाठी फक्त हिंदू कुटुंबांकडेच जाणार...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

1. सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका, हॉस्पिटलमध्ये दाखल

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सौरभ गांगुलीला दक्षिण कोलकाता येथील वूडलँड या एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर आज सांयकाळी अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया होणार आहे.गांगुलीच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. 

2. LeT दहशतवादी आणि मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड लखवीला अटक

नवीन वर्षाच्या सुरुवातील एक चांगली बातमी समोर आली आहे. मुंबईवर झालेल्या 26/11 या अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी झाकी उर रहमान लखवी याला अटक करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. दहशतवाद्यांना पैसे पुरविल्याच्या आरोपाखाली  त्याला अटक करण्यात आली असून मुंबई हल्ल्याचा कट रचणे आणि त्याच्या अंमलबजावणीत हाफिज सईद याच्यासोबत झाकी उर रेहमान लखवी याचा हात होता असं समजलं जातंय 


3. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना जीवे मारण्याच्या धमकीचा पोस्टर
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी मोहाली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. ३१ डिसेंबर रोजी रस्ता दाखवणाऱ्या एका नकाशांवर अमरिंदर सिंह यांनी जीवे मारण्याच्या धमकीचे पोस्टर चिकटवल्याचं दिसून आलं. तसंच यावर अमरिंदर सिंह यांना जीवे मारल्यास १ दशलक्ष डॉलर्सचं बक्षीसही देण्यात येणार असल्याचं नमूद करण्यात आलं.
4. औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा विरोधच: अशोक चव्हाण

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये नुरा कुस्ती सुरु नाही. औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोधच आहे, असे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ठणकावून सांगितले आहे. ते शनिवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामांतराविषयी काँग्रेसची भूमिका रोखठोकपणे मांडली.


 5. आकडा टाकणाऱ्यांनो सावधान- ऊर्जामंत्री नितीन राऊत

लॉकडाऊनच्या काळात वाढील वीज बिल लोकांना आली होतीत. त्यावरून राज्य सरकारवर अजुनही टीका होताना दिसत आहे. अशातच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणामधील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.वीज चोरीला आळा घालण्यासाठी सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्यासोबतच वीज चोरीची माहिती देणाऱ्यांना बक्षीस द्यावं. महावितरणच्या महसूल वाढीसाठी प्रयन करावेत अशा सूचना राचे डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या.


6. लोकलला ग्लोबल करण्यासाठी नव्या कल्पना घेऊन पुढे या;पंतप्रधानांच आवाहन
कोरोना महासाथीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना 'लोकलसाठी व्होकल' होण्याचं आवाहन केलं होतं. तसंच आपण आत्मनिर्भर झालं पाहिजे असंही ते म्हणाले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ओदिशातील संबलपूर येथील आयआयएमच्या कॅप्सच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं तसेच देशभरातील आयआयएमच्या विद्यार्थ्यांनी लोकलला ग्लोबल करण्यासाठी नव्या कल्पना घेऊन पुढे आलं पाहिजे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

7. नांदेड ते भीमा कोरेगाव बाईक रॅली काढणाऱ्या 17 जणांवर गुन्हा दाखल
दरवर्षी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी नांदेड ते भीमा कोरेगाव अशा मोटरसायकल अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही रॅलीचे आयोजन आले होते. रॅलीचे प्रमुख श्याम निलंगेकर यांच्या नेतृत्वात नांदेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरुवात झाले असता वजिराबाद पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी या रॅलीला मजाव केला. आणि रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

8. प्रजासत्ताक दिनी 'ट्रॅक्टर परेड' काढणार; आंदोलक शेतकऱ्यांची घोषणा
नव्या कृषी कायद्यांवरुन सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन आता आणखी तीव्र करण्याची तयारी आंदोलन शेतकऱ्यांनी केली आहे. प्रजासत्ताक दिनी अर्थात २६ जानेवारी रोजी दिल्लीच्या सिंघू सीमेवर 'ट्रॅक्टर परेड' काढणार असल्याचं संयुक्त किसान मोर्चाने जाहीर केलं आहे. आज दुपारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी माहिती दिली

9. "राम मंदिराच्या वर्गणीसाठी फक्त हिंदू कुटुंबांकडेच जाणार"

 राम मंदिराच्या उभारणीसाठी सर्वसामान्य जनतेचंही योगदान लाभावं यासाठी देशातील नागरिकांकडून निधी जमा करण्यात येणार असल्याचं विश्व हिंदू परिषदेने जाहीर केलं होतं. मात्र वर्गणी फक्त हिंदू कुटुबांकडेच मागणार असल्याचं विहिंपकडून सांगण्यात आलं आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशातील फक्त हिंदू कुटुंबांकडेच वर्गणी मागण्यासाठी जाणार असल्याचं विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विजय शंकर तिवारी यांनी सांगितंल आहे.


10. UPI पेमेंट् वरती लागणार शुल्क 

केंद्र सरकारने डिजिटल व्यवहारांवर जोर दिल्यापासून नागरिकांकडून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI द्वारे व्यवहार वाढले आहेत. अनेक खासगी बँकांनी UPI द्वारे व्यवहार करण्याची सुविधा सुरू केली आहे आजपर्यंत मोफत असलेले युपीआय ट्रान्झेक्शनसाठी आता तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. कारण UPI पेमेंटवर १ जानेवारीपासून शुल्क आकारले जाणार आहे. जर कोणी थर्ड पार्टी अॅपद्वारे युपीआय ट्रान्झेक्शन करणार असेल तर त्यासाठी शुल्क मोजावे लागणार आहे 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *