Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - अहमदनगर चे नाव अंबिकानगर करा - खा . सदाशिव लोखंडे

No comments

News24सह्याद्री अहमदनगर चे नाव अंबिकानगर करा  - खा . सदाशिव लोखंडे...पहा शहराची खबरबात


TOP HEADLINES

1. मोटरसायकल चोरास अटक
मोटरसायकल चोरीचा शोध घेताना तोफखाना पोलिसांना मोटारसायकल चोर सापडला त्याच्याकडून तीन मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केले आहेत १२ डिसेंबर रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीची फिर्याद दाखल झाली होती तोपखाना  ठाण्यातील पोलिस या गुन्ह्याचा तपास करत असताना  तोपखाना साळातोटी  कारणज्या परिसरात एक संशयित मोटारसायकलस्वार फिरताना आढळला असताना त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी त्याचे नाव गणेश देविदास नल्ला असे सांगितले त्याने शहरात मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली 

2. क्रांतिज्योती महिला सन्मान सोहळ्याचे रविवारी आयोजन
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महिला शिक्षणासाठी अमुलाग्र काम केलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने क्रांतिज्योती महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन रविवारी दिनांक 3 जानेवारीला करण्यात आले असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे या सोहळ्यामध्ये नगर शहरातील शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिलेल्या मुलींचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे
 
3. उड्डाणपुलासाठी 242 वृक्षांचा बळी
शहरातील बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाचे काम आता सुरू झाली आहे मात्र या पुलाच्या कामासाठी 242 वृक्षांचा बळी जाणार आहे ही बाब महापालिकेत झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत पुढे आली पुला लगत असलेल्या महसूल अधिकाऱ्यांचे बंगले महापालिका उद्यानसह रस्त्यालगतची मोठी वर्षे कापली जाणार आहेत

4. डॉ.निलेश शेळके याच्या पोलिस कोठडीत आणखी वाढ  
शहर सहकारी बँकेकडून बोगस कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेऊन बँकांची व सहकार्‍यांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या डॉ.निलेश शेळके याच्या पोलिस कोठडीत आणखी वाढ करण्यात आली आहे. याआधी 2 जानेवारीपर्यंत त्याला पोलिस कोठडी दिली होती. त्याची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याच्या पोलिस कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी डॉ. नीलेश शेळके याला पुण्यातून अटक केली होती. शहर सहकारी बँकेतील बोगस कर्जप्रकरणी शेळके याच्या विरुध्द सप्टेंबर 2018 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. एकूण 5 कोटी 75 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
   
5. अहमदनगर चे नाव अंबिकानगर करा  - खा . सदाशिव लोखंडे 
औरंगाबादचं नाव संभाजी नगर करा हि मागणी पुढे रेटत असतांना शिर्डी मदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनीं अहमदनगर च नाव अंबिका नगर करावे अशी मागणी केल्याने पुन्हा एकदा हा मुद्दा वादाचा आणि चर्चेचा ठरला आहे 
 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *