जिल्ह्याची खबरबात - बाजार समिती संचालकाच्या मुलाची गोळी झाडून आत्महत्या
News24सह्याद्री - बाजार समिती संचालकाच्या मुलाची गोळी झाडून आत्महत्या..पहा जिल्ह्याची खबरबात
TOP HEADLINES
1. जिल्हा परिषद प्राथमिक उपचार केंद्राची गरज
एखाद्या कर्मचार्याला अचानक त्रास सुरू झाल्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्याची वेळ येते त्यामुळे जिल्हा परिषदेत तातडीने प्रथमोपचार केंद्र सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य कर्मचाऱ्यांनी केली
2. गॅस सिलेंडरचा स्पोर्ट झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान
गॅसने पेट घेतलेला व घरातील चार खोल्यांमधील सर्व वस्तू यामध्ये कपडे किराणा अन्नधान्य कागदपत्रे फ्रीज कपाट इत्यादी सर्व वस्तू जळून खाक झाल्या मात्र यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही या घटनेची माहिती मिळताच देवळाली नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली आहे
3. चतुर्थीनिमित्त निद्रिस्त गणपती मंदीरात प्रवेश खुला
या निमित्ताने शासकीय नियमांचे पालन करून भाविकांना दर्शनासाठी मंदीरात प्रवेश खुला करण्यात आलाय , सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणुन मास्क शिवाय आत प्रवेश असणार नाही असे आवाहन गणपती मंदिर ट्रस्टचे मालोजीराव भुसारी यांनी सांगितले.
4. रब्बी हंगामातील पिके हवामानाच्या बदलामुळे धोक्यात
शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. निसर्गाच्या लहरी पणामुळे पिके हातातुन जाते की काय अशी चिंता शेतकऱ्यांना वाटत आहे.या साठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज शेतकरी वर्गातुन होत आहे
5. बाजार समिती संचालकाच्या मुलाची गोळी झाडून आत्महत्या
आज पहाटे राहत्या घरी ही घटना घडली आत्महत्तेचेच कारण मात्र समजू शकले नाही लक्ष्मणराव नलगे यांना सुधीर व दादासाहेब ही दोन मुले आहेत त्यापैकी दादासाहेब हा दौंड येथील व्यवहार पाहत होता
6. आठवडे बाजारात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या
भामट्यांनी खिशातील मोबाईल लांबविले चोरी गेल्याचे लक्षात येताच संबंधितांनी आठवडा बाजारात शोध घेतला मात्र तो व्यर्थ ठरला असल्याचे उघड झाले आहे चोरीच्या घटनांना आळा बसण्यासाठी पोलिसांची गस्त सुरू होती बंद पडलेली गस्त पुन्हा सुरू होण्याची गरज आहे
7. लष्करी सरावासाठी 25 हजार हेक्टर जमीन अधिसूचना क्षेत्र
दर पाच वर्षांनी अशी अधिसूचना क्षेत्र म्हणून जाहीर अरण्यात आले दार ५ वर्षांनी अशी अधिसूचना अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येते या सूचनेमुळे सराव क्षेत्रात दैनंदिन व्यवहारात कोणताही बदल होणार नसल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले आहे
8. दूध संकलन केंद्रावर छापा
राहुरी तालुक्यातील चंडकापूर येथे जय भवानी दूध संकलन केंद्रावर नगर येथील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला दूध व दूध भेसळीच्या रसायनांची तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला भेसळयुक्त दुधाचे व रसायनाचे नमुने घेऊन विश्लेशणासाठी ५३२ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आला जागेवर नष्ट करण्यात आला
9. पशुपालनासाठी खेळते भांडवल योजना
नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील 45 हजार शेतकऱ्यांना पशुपालनासाठी 268 कोटी रुपयांचे खेळते भांडवल वाटप केले आहे एका खातेदारास पंधरा हजार ते दीड लाखांपर्यंत हे भांडवल दिले जाते यंदा पहिल्यांदाच ही योजना राबविली जात असून त्याचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हा बँकेकडून सांगण्यात आले
10. मानवता हाच एकमेव धर्म आहे - बिपिन कोल्हे
फळाची अपेक्षा न ठेवता प्रामाणिक सेवा केली तर यश निश्चित मिळते असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केलेल्या कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील श्री कृष्ण मंदिराचे भूमिपूजन बिपीन कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते
No comments
Post a Comment