गॉसिप कल्ला - राधे श्याम चित्रपटाची रिलीज डेट आऊट
News24सह्याद्री - राधे श्याम चित्रपटाची रिलीज डेट आऊट..पहा गॉसिप कल्ला
TOP HEADLINES
1. राधे श्याम चित्रपटाची रिलीज डेट आऊट
हातात प्रभासच्या आगामी 'राधेश्याम' या बहुप्रतीक्षित चित्रपटची डेट रिलीज केली आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये प्रभास आणि पूजा हेगडे दिसून येत आहे. 'राधेश्याम' मध्ये अभिनेत्री 'पूजा हेगडे' मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले असून 2021 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
2. धर्मेंद्र यांचे शेतकऱ्यांना समर्थन
सोमवारी धर्मेंद्र यांनी ट्विटरवर आंदोलक शेतकऱ्यांचा फोटो शेअर करताना म्हटले आहे, 'आज, माझे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. मी प्रार्थना करतो की, प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक मनाला शांती मिळणे आवश्यक आहे.'
3. नव्या वर्षात धमाका करायला 'दीपिका पादुकोण' तयार
दीपिका पादुकोण या चित्रपटात स्टाईलिश चोरणीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाविषयी दीपिकाबरोबर चर्चा सुरू आहे. मात्र, सध्या दीपिकाचे वेळापत्रक व्यस्त आहे. दीपिका शाहरुख खान सोबत पठाण चित्रपटाच्या शूटिंगमध्ये आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे
4. नव्या वर्षात रोहित शेट्टीने स्वीकारलं नवं चॅलेंज
सिंबा, गोलमाल, चेन्नई एक्स्प्रेस, ऑल दी बेस्ट, सिंघम रिटर्नस् अशा अनेक चित्रपटातून रोहितने आपलं मनोरंजन केलं आहे. आता रोहित शेट्टीला नवं माध्यम खुणावत आहे. ते माध्यम आहे ओटीटीचं. रोहित शेट्टी लवकरच ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे.
5. अक्षयच्या Fau-G गेमचे गाणे रिलीज
गेल्या वर्षी चिनी गेम पबजीवर बंदी आल्यानंतर अभिनेता अक्षयपुमारने देशी गेमिंग कंपनीसोबत Fau-G गेम लाँच करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता अक्षयने या गेमचे गाणे सोशल मीडियावर रिलीज केले आहे. लवकरच प्रजासत्ताक दिनी Fau-G गेमचे लाँचिंग होणार आहे.
No comments
Post a Comment