Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - आता ईशान खट्टर करणार थ्रिलर चित्रपट

No comments

      News24सह्याद्री आता ईशान खट्टर करणार थ्रिलर चित्रपट...पहा गॉसिप कल्ला


TOP HEADLINES

 1. जितेंद्र जोशी याच्या गोदावरी सिनेमाची पहिली झलकनाटक, टीव्ही, सिनेमा, वेबसिरीज या सर्व माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा मराठी सिनेसृष्टीतील कसदार अभिनेता जितेंद्र जोशी  आता निर्मिती क्षेत्रात आपले नशिब आजमावत आहे. 'गोदावरी' या सिनेमाची निर्मिती करत जितेंद्र जोशी ने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलाय. सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून जितेंद्र जोशी ने तो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

2. आता ईशान खट्टर करणार थ्रिलर चित्रपट
बॉलीवूड अभिनेता ईशान खट्टर सध्या न्यू ईयर सेलिब्रेट करण्यासाठी मालदीवला गेला आहे. तसेच तो त्याच्या नवीन चित्रपटमुळे चर्चेत आला आहे. ईशानने आपल्या कारकिर्दीची सुरुवात 2018मध्ये धर्मा प्रॉडक्‍शनच्या 'धडक' चित्रपटातून केली होती. या चित्रपटानंतर ईशान आणि अनन्या पांडेची जोडी 'खाली पिली'मध्ये दिसली होती. ईशान खट्टर सध्या हॉरर-कॉमेडी 'फोन भूत' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय ईशान खट्टरकडे 'पिप्पा' हा चित्रपटदेखील आहे.  
3. 'आई कुठे काय करते' मालिकेचं कथानक उत्कंठावर्धक वळणावर
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अनिरुद्धकडून फसवणूक झाल्यानंतर खचून न जाता अरुंधती स्वयंपूर्ण झाली आणि कठीण प्रसंगात तिने स्वत:ला आणि संपूर्ण कुटुंबाला सावरलं. एरव्ही अरुंधतीचा वाढदिवस कुणाच्या लक्षात रहात नसे. पण यंदा मात्र यश आणि गौरीने मिळून अरुंधतीच्या वाढदिवसाचं दिमाखदार सेलिब्रेशन करायचं ठरवलं आहे. त्यासाठी जोरदार प्लॅनिंगही सुरु झालं आहे.  
4. कंगणाला न्यायालयाचा झटका ; मुंबई पालिकेच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार
आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येणारी अभिनेत्री कंगना रनौत अडचणीत आली आहे. कंगनाने  तिच्या घरात केलेले बदल हे आराखड्याच्या विरुद्ध असल्याचे सांगत मुंबई दिवाणी न्यायालयाने तिची याचिका फेटाळली आहे. तसेच पालिकेकडून केल्या जाणाऱ्या कारवाईला स्थगिती देण्यासही न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे कंगनाच्या अडचणींत वाढ झाली आहे.
5. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर लता दीदींनी केलं पंतप्रधान मोदींच्या कामाचं कौतुक
भारताची सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक केलं आहे. याप्रसंगी त्यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, 'नरेंद्र भाई मोदी तुम्हाला माझा सादर प्रणाम. तुम्ही देशासाठी जे काम करत आहात, ते प्रशंसनीय आहे. मी तुम्हाला नवं वर्षाच्या शुभेच्छा देते आणि तुमच्या आईला प्रणाम करते' अशा शब्दांत लता मंगेशकर यांनी नरेंद्र मोदी यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.    



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *