Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग - 'औषध' की 'जीवाशी खेळ' नागरिकांचा सवाल

No comments

  News24सह्याद्री -




कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रोग प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या 'आर्सेनिक अल्बम' गोळ्यांचा ग्रामपंचायतींना पुरवठा करण्यात आला होता. शेवगाव तालुक्यात नागरिकांना वाटप करण्यासाठी देण्यात येणाऱ्या या गोळ्या निकृष्ठ दर्जाच्या असल्याचे आढळून आल्याने शेवगाव तालुक्यात खळबळ माजली आहे. सदर गोळ्या अहमदनगर जिल्हा परिषद करिता पुण्यातील सुमन होमिओ फार्मसी यांनी पुरविल्या आहेत.  पाच महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेच्या खात्यावर १ लाख ४८ हजार ७६० रुपये जमा करण्यात आले होते.  मात्र त्या डब्यांमध्ये घट्ट झालेला पांढरा द्रव पदार्थ तयार झाल्याचे आढळून आले आहे. ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांनी या गोळ्या घेण्यास नकार दिला आहे. 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *