अभिनेत्री अमिषा पटेलचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक
मुंबई -
सध्याच्या काळात सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी इन्स्टाग्राम, ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत.आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्याची प्रकरण उघड झाली आहेत. यामध्येच आता अभिनेत्री अमिषा पटेल हिचंदेखील इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले आहे. अमिषाच्या एका चुकीमुळे तिच्यावर हा प्रसंग ओढावल्याचे सांगण्यात येत आहे.
एका गैरसमजामुळे अमिषाचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले. असून सध्या याप्रकरणी तपास सुरु आहे. तसंच महाराष्ट्र सायबरने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अमिषाचं अकाऊंट पूर्ववत करण्यासाठी तिची परवानगी घेत तपास करत आहेत. विशेष म्हणजे अमिषाचे अकाऊंट हॅक झाल्यानंतर हॅकरने तिचे अकाऊंट लॉक केले असून त्यामधील पोस्ट्स डिलीट केल्याचे दिसून आले.
४ जानेवारी रोजी अमिषाला इन्स्टाग्राम अकाऊंटवर Account will be suspended within 24 hours for violating Instagram’s Copyright Law” हा मॅसेज आला होता. या मेसेज बरोबर Copyright Objection Form असा मॅसेज लिहून एक लिंक पण देण्यात आली होती. त्यामुळे अमिषाने या लिंकवर क्लिक केले आणि त्यानंतर एका तोतया इन्स्टाग्राम वेबसाईटवर तिला डायरेक्ट केलं गेले व लगेच काही वेळात तिचं अकाऊंट लॉक झाले. याप्रकरणी सायबर सेलची टीम हॅकरचा शोध घेत आहे. तसंच तपास करत असताना अमिषाला मिळालेली लिंक ही नेदरलँडमधील असून IP ADDRESS हा तुर्कस्थानमधील असल्याचं सांगण्यात येत आहे.

No comments
Post a Comment