Breaking News

1/breakingnews/recent

तूप खाल्याने होतात 'हे' फायदे

No comments




मुंबई -

सध्याच्या काळात प्रत्येक जण हेल्थ कॉन्शस झाला आहे. त्यामुळे गोड पदार्थ किंवा तेलकट, तुपकट पदार्थ खाणं अनेक जण टाळतात. मात्र, तूप किंवा दुग्दजन्य पदार्थ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे आहेत. त्यामुळे त्याचा आहारात कायम समावेश करायला हवा. तूपामुळे वजन वाढतं किंवा स्थुलता येते असा अनेक जणांचा गैरसमज आहे. मात्र, तसं अजिबात नसून तुपामुळे शरीराला वंगण मिळतं. त्यामुळे आहारात दररोज साजूक तुपाचा वापर केला पाहिजे.तूप खाण्याचे काही फायदे. आजकाल तुपाबाबत अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. तुपामुळे वजन वाढतं या समजापोटी अनेक जण आहारातून तुप वर्ज्य करतात. मात्र आयुर्वेद शास्त्रानुसार तुप शरीराच्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचे असते. म्हणूनच आयुर्वेदात तुपाला सात्विक अन्नाचा दर्जा देण्यात आला आहे. अनेक विकारांमध्ये तुपात औषधे टाकून त्याचे चाटण रुग्णाला दिले जाते. शरीरस्वास्थ निरोगी राहण्यासाठी रिकाम्यापोटी तुपाचे सेवन केल्यामुळे अथवा नाकात शुद्ध तूप टाकल्याने अनेक आजारपणे दूर ठेवता येतात.

१. शरीराला उष्णता मिळते

हिवाळ्यात तुपात तयार केलेले विविध प्रकार लाडू, हलवा, शिरा असे पदार्थ खाण्याची  पद्धत आहे. कारण तुपातून तुमच्या शरीराला उष्णता मिळू शकते. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी तूप फायदेशीर ठरू शकते. यासाठी पोळीवर लावा तूप आणि मिळवा आरोग्यदायी फायदे

२.. इन्स्टंट एनर्जी मिळते

अनेक संशोधनानुसार तुपात त्वरीत उर्जा निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे. शरीराची झीज भरून काढण्यासाठी तुप फायदेशीर ठरते. यासाठी नवमातांना बाळंतपणानंतर झालेली शरीराची  झीज भरून काढण्यासाठी, खेळाडूंना त्यांचा स्टॅमिना टिकविण्यासाठी, कुस्ती खेळणाऱ्या लोकांना तुपाचा खुराक देण्यात येतो.

३. स्मरणशक्ती वाढते

तुपाचा तुमच्या मेंदूच्या आरोग्यावरदेखील चांगला फायदा होतो. ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्यास मेंदूच्या नसांना योग्य पोषण मिळते. नियमित तुप खाण्यामुळे तुम्हाला भविष्यात अल्झामर अथवा स्मृतीभ्रंश होण्याचा धोका कमी असतो.

४. मुळव्याधीचा त्रास कमी होतो

नियमित आहारात तुपाचा समावेश केल्यास अथवा झोपताना दुधात एक चमचा तूप टाकून प्यायल्यास सौचाला साफ होते. ज्यामुळे मुळव्याधीचा त्रास कमी होतो.

५. सांधेदुखीतून आराम मिळतो

तुपामुळे शरीराला नैसर्गिक वंगण मिळते. शिवाय तुपात ओमॅगा 3 फॅटी असतात ज्यामुळे सांध्याचे कार्य सुधारते आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

६. लहान मुलांच्या वाढीसाठी उत्तम

लहान मुलांच्या वाढीसाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी तूप एक योग्य आहार आहे. तुपातील ओमॅगा 3 फॅटी अॅसिडमुळे तुमची मजबूत राहतात.

७. वजन नियंत्रित राहते

तुपाचे सेवन केल्यामुळे पचनशक्ती सुधारते. पचनशक्ती सुधारल्यामुळे तुम्हाला वेळेत भूक लागते आणि तुम्ही अवेळी चुकीचे पदार्थ कमी खाता. ज्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

८. तूप कॅन्सर पेंशटसाठी उपयुक्त

तुप कर्करोगाच्या रूग्णासाठी अतिशय फायदेशीर आहे. कारण तुपामध्ये कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी करण्याचे गुणधर्म असतात.

९. अशक्तपणा कमी होतो

तुपामध्ये मेंदूच्या कार्याला स्फुर्ती देण्याचे सामर्थ्य आहे. ज्यामुळे तुम्ही लवकर थकत नाही. अशक्तपणा आल्यास तुपाचा आहार वाढवावा ज्यामुळे तुम्हाला उत्साही वाटू शकते.

१०. हातापायाची जळजळ कमी होते

तुप थंड गुणधर्माचे असल्यामुळे तुपाने हात आणि पायाच्या तळव्यांना मालिश केल्यामुळे हातापायांना होणारी जळजळ कमी होते.

११. डोळ्यांचे विकार कमी  होतात

डोळ्यांच्या समस्या असतील तर डोळ्यांमध्ये शुद्ध तूप टाकल्यामुळे चांगली झोप लागते. शिवाय शुद्ध तुपापासून तयार केलेले काजळ डोळ्यांमध्ये लावल्यास डोळ्यांना आराम मिळतो.

१२. तुपाचे त्वचेवर होणारे फायदे

तुपाचे आरोग्याप्रमाणे त्वचेवरही खूप चांगले फायदे होतात. त्वचेची निगा राखण्यासाठी हे फायदे तुम्हाला माहीत असायलाच हवे.तुपामुळे तुमच्या त्वचेचे योग्य पोषण होते. नितळ आणि चमकदार त्वचेसाठी तूप घेण्यासोबतच त्वचेवर तुपाने मालिश देखील जरूर करा. कारण तुपामुळे तुमच्या त्वचेतील ओलावा कायम राहतो आणि त्वचा कोरडी पडत नाही.  जखम, व्रण, पायांच्या टाचा फुटणे, अंगाला खाज येणे अशा त्वचेच्या समस्यांवर आपण शुद्ध तूपाचा मलमासारखा वापर करू शकतो.जुने तूप पूर्वीच्या काळी युद्धात झाल्यामुळे होणाऱ्या जखमा बऱ्या करण्यासाठी वापरला जात असे. त्यामुळे तूप जितकं जुनं तितकं ते त्वचेसाठी उत्तम ठरतं.त्वचेप्रमाणेच तुम्ही केसांनाही तूप लावू शकता कारण केसांवर तुपाचे होणारे फायदे अनेक आहेत.

१३. नाकात तूप टाकून करा आजारपणांवर करा मात

नाकात तूप टाकणे हा निरोगी राहण्याचा एक उत्तम मार्ग आहे. यासाठी जाणून घ्यान नाकात तूप टाकल्यामुळे नेमकं काय होतं.केसांच्या समस्या दूर करण्यासाठी आणि केस वाढण्यासाठी दररोज नाकात शुद्ध तेलाचे दोन थेंब टाका.त्वचेवर अॅलर्जी उठत असेल तर नाकात तूप टाकल्यामुळे ती कमी होऊ शकते.मायग्रेनच्या त्रासातून मुक्त व्हायचं असेल दररोज नाकात दोन थेंब शुद्ध तूप टाकण्याची सवय लावा.डोकेदुखी थांबविण्यासाठी नाकात तूप टाकल्यामुळे अथवा डोक्यावर तुपाचा मसाज केल्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो.नाकातून रक्त येत असल्यास नाकात तूप टाकल्यामुळे आराम मिळतो.नाकाचे हाड वाढल्यास नाकात तूप सोडल्यामुळे बरे वाटते.सर्दी झाल्यास नाकात तूप टाकल्यामुळे चोंदलेले नाक मोकळे होतेगरोदरपणात तूप देखील फायदेशीर आहे. 

१४. कोलेस्ट्रॉल अथवा रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांनी तूप खाणे योग्य आहे का ?

तूप आरोग्यासाठी नेहमीच उत्तम असते. जरी तुम्हाला कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबाचा त्रास असला तरी तुम्ही प्रमाणात तुपाचा आहार घेऊ शकता. कारण तुपामुळे तुमचे मेटाबॉलिझम वाढते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. मात्र यासाठी तुम्हाला घरातील शुद्ध तूप आहारातून घ्यावे लागेल. बाजारात मिळणाऱ्या बटरचा वापर करणं चुकीचं ठरेल



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *