Breaking News

1/breakingnews/recent

23 जानेवारी सह्याद्री बुलेटिन

No comments

      News24सह्याद्री - बनावट लग्न लावणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES


1. बनावट लग्न लावणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद 

चंदनझिरा  सह तीन जिल्हातुन  शिताफिने  तीन खोटया नवरी-यासह एक टोळी प्रमुख महीला व एक आरोपी असे एकुण पाच आरोपी ताब्यात घेतले आहे याप्रकरणी  पोलीस ठाणे चंदनझिरा येथे पियुष शांतीलाल वसंत यांनी तक्रार दिली असता पोलीस पथकाने कारवाई करत एका सौंशईत महिलेला अटक केली असून विश्वासाने विचारपूस केली असता तिने गुन्हा काबुल केलाय तसेच  केलेल्या आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. तसेच यातील सातेफळ येथील मुख्य आरोपी असलेल्या महीलेवर यापुर्वी देखील जालना, बुलढाणा व औरंगाबाद जिल्हातील विविध पोलीस ठाणे येथे याप्रकारचे गुन्हे दाखल आहे.  

2. प्रेत नष्ट करण्याच्या उद्देशाने बंधाऱ्यातफेकला मृतदेह 
 त्याच्या शरीरावर धारदार हत्याराने हत्या करून प्रेत नष्ट करण्याच्या उद्देशाने बंधाऱ्यात असलेल्या पाण्यात फेकण्यात आले. पोलीस स्टेशन नी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज गदादे तपास करीत आहेत

3. देवेंद्र फडणवीसांकडून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन
आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 95वी जयंती आहे. यानिमित्ताने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांना अभिवादन करत व्हिडीओ ट्वीट केला आहे.विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करुन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आहे. यावेळी त्यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. मात्र हा व्हिडीओ फडणवीसांनी शिवसेनेला चिमटे काढण्यासाठी ट्वीट केलाय का? , असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे.

4. लोकांसाठी झटणाऱ्यांना जनता कधीही विसरत नाही

समाजातील शेवटच्या माणसापर्यंत बांधिलकी बाळगा. लोकांसाठी झटा. लोकांसाठी झटल्यास तेही तुम्हाला कधीच विसरत नाहीत, असा कानमंत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वो शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. शरद पवार यांच्या हस्ते वारजे येथे 45 मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी त्यांनी खडकवासला परिसरातील आठवणींना उजाळा देतानाच कार्यकर्त्यांना हा  मोलाचा सल्लाही दिला.  

5. कल्याण-डोंबिवलीकरांसाठी दिवाळी दसरा,पत्री पुलाचं काम पूर्ण
कल्याण-डोंबिवलीकरांसाठी मोठी बातमी आहे. गेल्या अनेक काळापासून ज्या दिवसाची वाट कल्याणवासी पाहात होते, त्या पत्री पुलाचे काम अखेर पूर्ण झालं आहे. पत्री पुलाचं काम पूर्ण होणं हे कल्याण-डोंबिवलीकरांसाठी दिवाळी-दसरा सारखी आहे. या पुलाच्या कामामुळे गेल्या 26 महिन्यांपासून नागरिकांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागला. मात्र, आता या पुलाचं काम झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

6. कोरोना लसींची तूर्तास खुल्या बाजारात विक्री नाही  
देशात तयार झालेल्या कोवॅक्सिन आणि कोव्हीशिल्ड या दोन लसींची खुल्या बाजारात विक्री केव्हा सुरू होणार असा प्रश्न विचारला जात होता. या प्रश्नाचं उत्तर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलं आहे. या दोन लसींचा नियंत्रित स्वरुपात वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन लसी बाजारात खुल्या विक्रीसाठी तूर्तास उपलब्ध होणार नाही असे भूषण यांनी सांगितले आहे. राष्ट्रीय औषध नियंत्रण प्राधिकरण म्हणजेच DGCI जोपर्यंत या लसींचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे या लसींच्या विक्रीला मान्यता देत नाही तोपर्यंत या लसींची खुल्या बाजारात विक्री शक्य नाही असे सांगण्यात आले आहे  

7. राज्याच्या आरोग्य विभागाच्या 8500 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध
राज्याच्या आरोग्य विभागाने रिक्त असलेल्या 17 हजार पदांपैकी 50 टक्के पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी 28 फेब्रुवारीला एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांनी फेब्रुवारी 2019 साली महापोर्टलवरुन अर्ज केले होते ते सर्व उमेदवार यासाठी पात्र ठरतील.

8. केंद्राने उत्तर द्यावं: अनिल देशमुख 
 अर्णव गोस्वामी यांना 23 तारखेला ही बातमी कळली. त्यांना तीन दिवस आधी ही माहिती कशी मिळाली. हल्ल्याची माहिती केवळ चारपाच महत्त्वाच्या नेत्यांनाच असते. केंद्रीय मंत्र्यांनाही ही माहिती नसते. मग अर्णव यांना ही माहिती कशी मिळाली? हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रश्न असून अत्यंत गंभीर बाब आहे. त्यावर केंद्र सरकारने उत्तर दिलं पाहिजे, असंहि  देशमुख म्हणाले

9. भाजयुमोच्या सहकार विभागपदी राहुल महाडिक यांची निवड
भारतीय जनता युवामोर्चा महाराष्ट्र प्रदेश सहकार विभाग संयोजकपदी व सातारा जिल्हा भाजयुमोच्या प्रभारी पदी राहुल महाडिक  यांची निवड करण्यात आली. मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवामोर्चा राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत त्यांच्यावर पक्षाने आणखी काही नव्यानेजबाबदाऱ्या टाकल्या आहेत 

10. समृद्धी महामार्गाला संभाजी राजांचे नाव देण्याची मागणी
नागपूर-मुंबई महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समृद्धी महामार्ग असे नाव देण्याची मागणी छावा क्रांतिकारी सेनेने केली आहे. महामार्गाच्या कामामुळे कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या हानीची भरपाई करावी, अशी मागणी करत छावा क्रांतिकारी सेनेच्या कार्यकर्त्यांनी कोपरगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे  



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *