Breaking News

1/breakingnews/recent

2 जानेवारी डिसेंबर सह्याद्री बुलेटिन

No comments

  News24सह्याद्री - लसीकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांच्या  महत्त्वाच्या सूचना....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES


 1. 'चिंतातुर जंतूप्रमाणे भाजपनं उगाच वळवळ करू नये', शिवसेनेचं टीकास्त्र

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरुन सध्या राजकारण तापलं आहे. काँग्रेसनं औरंगाबादच्या नामांतराला विरोध केल्यानंतर भाजपनं शिवसेनेला सवाल केले आहेत. यावरुन आता शिवसेनेनं भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये. पाकिस्तानात हिंदू मंदिरांची तोडफोड सुरू आहे. तेथे एखादा सर्जिकल स्ट्राइकचा फुगा फोडता येईल काय ते पाहावे, अला टोला शिवसेनेनं भाजपाला लगावला आहे  

2. कोरोना लशीबाबतच्या प्रश्नांवर एम्सच्या गुलेरिया यांनी दिलं उत्तर
कोरोनाच्या लसीचे किती डोस दिले जाणार?, यासाठी कोण खर्च करणार? अशा अनेक प्रश्नांचं एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी उत्तर दिलं. सद्यस्थितीत लसीचा खर्च हा केंद्र सरकार करणार असल्याचे ते म्हणाले. सध्या ज्या लोकांना गंभीर आजार आहेत अशा लोकांची यादी तयार करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाईन वर्कर्स यांच्यानंतर त्यांना कोरोनाची लस दिली जाणार असल्याची माहिती रणदीप गुलेरिया यांनी दिली.  

 3. 1 लाख 39 हजार तीनशे रुपयांचा घुटखा जप्त
 बामणी पोलीस स्टेशन हदीतील  सावंगी येथील घुटखा माफिया यांच्या शेतातील आखाड्यावर टाकलेल्या धाडीत 1 लाख 39 हजार 300 रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आलाय.   ASI मोइनोद्दीन पठाण यांनी याबाबत  फिर्याद दिली असून आरोपी विरुद्ध बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

4. पुण्यातून आला रिपोर्ट गुजरातचं वाढलं टेन्शन
23 डिसेंबरला 175 प्रवासी लंडनहून अहमदाबादला आले होते. त्यापैकी चार रुग्णांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे अशी माहिती पुण्यातील वायरोलॉजी रिपोर्टमधून खुलासा झाला आहे. अद्याप 6 रुग्णांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली आहे. लंडन ते अहमदाबादला आलेल्या प्रवाशांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन सतर्क झालं आहे.  

5. लसीकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांच्या  महत्त्वाच्या सूचना
राज्यात चार टप्प्यांत लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची पूर्वतयारी म्हणून लसीकरणाची रंगीत तालीम देशभरात राबविण्यात येत आहे. मात्र  लस घेतली म्हणजे करोनामुक्त झालो असा गाफिलपणा बाळगू नका. लसीकरणानंतरही सोशल डिस्टनसिंग आणि मास्क बंधनकारक असणार आहे. लसीचे परिणाम जाणवायला दोन ते चार महिने लागू शकतात,' अशा सूचना राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.

6. संजय राऊत यांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. माझ्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरत टीका करण्यात येते. ही भाषा तुम्हाला मान्य आहे का, हे विचारण्यासाठी मी सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे,' असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावर आता शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'जर चंद्रकांत पाटील हे रश्मी ठाकरे यांना पत्र लिहीत असतील तर  मला त्यांची भीती वाटते ,' असं म्हणत संजय राऊत यांनी उपरोधिक शब्दांत चंद्रकांत पाटलांवर पलटवार केला आहे.

7. धुळ्याच्या बोरांना देशाच्या कानाकोपऱ्यात मागणी
धुळ्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीला फाटा देत भाजीपाला व इतर पिक आपल्या शेतात न घेता बोर उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असल्याचे दिसून येत आहे. धुळ्यातील बोरांना देशातील कानाकोप-यात मागणी देखील वाढली आहे. मागणीप्रमाणे धुळ्यातील शेतकरी देशाच्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यात बोरांचा पुरवठा देखील करीत आहेत.  

8. नवऱ्याला बायको-मुलाची आर्थिक जबाबदारी घ्यावीच लागेल, न्यायालयाचा निर्वाळा
नवरा दिव्यांग किंवा गरीब असला तरी त्याला पत्नी आणि मुलाच्या देखभालीची जबाबदारी टाळता येणार नाही, असा निर्वाळा मॅजिस्ट्रेट कोर्टाने दिला आहे. एका महिलेने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने हे स्पष्ट केलं आहे.  लग्नानंतर पत्नी आर्थिक दृष्ट्या पतीवर अवलंबून असेल तर तिचा खर्च उचलणं बंधनकारक आहे. पतीचे आईवडील कमावते असले तरीही पत्नीची आर्थिक जबाबदारी पतीवरच अवलंबून आहे, असं कोर्टाने यावेळी स्पष्ट केलं.

9. धोनीसोबतच्या वादावर सुरेश रैनाने मौन सोडलं
 सुरेश रैना मागच्यावर्षी आयपीएल अर्ध्यातून सोडून युएईतून भारतात परतला होता. रैनाने आयपीएलमधून माघार घेतल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. सुरेश रैनाचे आयपीएलदरम्यान धोनीसोबतही वाद झाले होते, असं बोललं गेलं. मात्र आता  रैनाने धोनीसोबतच्या मैत्रीवर प्रतिक्रिया दिली आहे. 'माझी आणि धोनीची मैत्री वेगळ्या प्रकारची आहे. आम्ही भारत आणि चेन्नईसाठी बऱ्याच मॅच जिंकल्या. मी आणि धोनी लवकरच भेटू. आमची पार्टनरशीप पुन्हा सुरू होईल. गोष्टी योग्य होतील आणि मला अपेक्षा आहे की सगळं काही योजनेनुसार होईल,' असं रैना म्हणाला.

10. ड्रग्ज केसमध्ये फसलेल्या अर्जुनसोबत कंगनाची पार्टी
नवीन वर्षाच्या निमित्ताने कंगनाने तिच्या घरी पार्टीचे आयोजन केले होते.  या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ कंगनाने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. मात्र, हे फोटो आणि व्हिडिओ पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे. कारण यामध्ये अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड दिसत आहे. बॉलिवूड ड्रग्स प्रकरणावर कंगना नेहमीच व्यक्त होत असते.  मात्र, आता कंगनाचा दृग्ज प्रकरणात नाव असलेल्या अर्जुन रामपालसोबतचा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *