Breaking News

1/breakingnews/recent

4 जानेवारी डिसेंबर सह्याद्री बुलेटिन

No comments

    News24सह्याद्री - मीरा भाईंदरच्या अफशाची गरुडझेप...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES

1. नाशिकमध्ये गॅस गळतीमुळे घरात स्फोट
गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण घर उद्ध्वस्त होऊन कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. हा स्फोट एवढा शक्तिशाली होता की घराची भिंत कोसळली. शिवाय घरापासून 10 ते 15 फूट अंतरावर असलेल्या वाहनाच्या काचाही फुटल्या.  

2. ईडी विरोधातील आंदोलनावर संजय राऊतांची भूमिका
 शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे. ‘तूर्त प्रदर्शनाची गरज नाही, रस्त्यावर ऊतरायचे तेव्हा ऊतरू. पण हया कारणासाठी नाही. बेकायदेशीर आणि राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ’ असं संजय राऊत म्हणाले.  

3. मीरा भाईंदरच्या अफशाची गरुडझेप
परदेशात नोकरी मिळवणे शक्य असतानाही अफशाने आपल्या मातृभूमीला प्राधान्य देत भारतात नोकरी करण्याचा निर्णय घेतला. खाटीक समाजातून असलेली अफशा कुरेशी ही देशातील मुस्लिम खाटीक समाजातील पहिली महिला पायलट ठरली आहे.

4. नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंचा जुना व्हिडीओ शेअर करत लगावला टोला
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांनी संभाजीनगर न बोलता औरंगाबाद म्हटले की त्यांना चपलेने मारायचे. असं  आदित्य ठाकरे व्हिडिओमध्ये बोलताना दिसत असल्यामुळे आता शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर देण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

5. बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपद सोडणार?
महाविकास आघाडी सरकारला वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र काँग्रेसमध्ये  अजूनही धुसफूस सुरूच आहे. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात  हे लवकरच प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

6. संभाजी महाराज यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्रात का रखडला - संजय राऊत
औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्यावरून राजकीय वाद पेटला आहे. भाजपनेही शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. पण, औरंगाबाद विमानतळाला संभाजी महाराज यांच्या नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे तो का रखडला आहे? असा थेट सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत  यांनी भाजपला विचारला आहे.  

7. कुत्र्याला पोत्यात टाकून जिवंत जाळले
 सगळा प्रकार विषप्रयोग करून केला गेला असावा, असा संशय व्यक्त केला जातोय.याप्रकरणात कुत्र्यांचं शवविच्छेदन करून त्याचा अहवाल मागवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली

8. महाराष्ट्राच्या पोराचा थक्क करणारा प्रवास
परभणीचे भुमिपुत्र डॉ. वेणुगोपाल सोमाणी हे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयचे संचालक असून त्यांनी देशातील कोरोनावरील दोन लशींना परवानगी दिली आहे. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद बाब ठरलीये

9. शिक्षा भोगून आलेल्या आरोपीने पुन्हा ५ वर्षीय बालिकेवर केला अत्याचार
 संदीप सुदाम तिरमाली असे या आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर तो पसार झाला होता. त्याला रात्रीच मनमाड येथे पकडण्यात आले. बलात्कार प्रकरणात त्याला सात वर्षाची शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून तो काही दिवसापूर्वीच परतला होता.

10. जळगावात महाविकास आघाडीत फूट, ग्रामपंचायतीत काँग्रेस स्वबळावर
जळगावातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे काँग्रेस आता परंपरागत शत्रू असलेल्या भाजपसह मित्रपक्षांविरुद्ध मोट बांधणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *