Breaking News

1/breakingnews/recent

औरंगाबादच नामांतरासाठी रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध राहील - रामदास आठवले

No comments


मुंबई -

औरंगाबाद नामांतरासाठी गेल्या काही दिवसामध्ये कलगीतुरा चांगलाच सुरु आहे. औरंगाबाद जिल्हाचे नाव बदलण्याचा काहीजण अट्टाहास करत आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असे वाद शासनाने बाजूला ठेवावेत. औरंगाबादचे नाव बदलण्यास रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध असेल, महाविकास आघाडी सरकारने औरंगाबाद नामांतराचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

कोरोनाच्या या काळात जनता खडतर दिवसांना सामोरे जात असताना राज्याच्या विकासाचे विधायक मुद्दे बाजूला ठेवून नामांतराचा मुद्दा राज्य सरकारने पुढे आणू नये. नामांतराच्या आंदोलनाची आम्ही धग भोगली आहे. त्यामुळे औरंगाबादचे नामांतर कु नये, रिपब्लिकन पक्षाचा त्याला तीव्र विरोध राहील, असे आठवले यांनी रविवारी स्पष्ट केले. छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही आदर्श मानणारे आहोत. मात्र संभाजी महाराजांच्या नावाचा कोणी राजकारणासाठी वापर करु नये, असे मतही आठवले यांनी व्यक्त केले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *