Breaking News

1/breakingnews/recent

शिवसेना हिंदूहृदयसम्राटांना मानते की नाही, हे पाहायची वेळ आली आहे: किरीट सोमय्या

No comments


मुंबई -

औरंगाबादला आता संभाजीनगर नाव देण्यात यावे. अशी मागणी शिवसेनेने केली आहे. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करावे या मुद्द्यावरून राजकीय कलगीतुरा रंगला आहे तो सुरूच आहे. गेल्या 5 वर्षापुर्वी सुद्धा शिवसेना भाजपसोबत सत्तेत होती आणि आता सुद्धा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असून औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण का झाले नाही? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये सुद्धा संभाजीनगर नामांतरावरून विरोध होत आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नामंतराला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षात असलेल्या भाजप आक्रमक झाली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. व्हिडिओमध्ये सोमय्या म्हणाले आहे की, काँग्रेस पक्षानंतर आता समाजवादी पक्षाने देखील संभाजीनगर नामकरणास विरोध केला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि शिवसेना हिंदूहृदयसम्राटांना मानते की नाही, हे पाहायची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे शिवेसेनेचा रंग आता हिरवा झाला आहे का? असे सवालही किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *