Breaking News

1/breakingnews/recent

पंतप्रधान मोदींचे देशवासियांना 'न्यू इयर गिफ्ट'

No comments



मुंबई -

नव्या वर्षात पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेली ही पहिली योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी 2022 पर्यंत देशातील बेघरांना पक्की घरे उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लाइट हाउस प्रोजेक्टचे उद्घाटन केले. केंद्र सरकारच्या या योजनेमुळे शहरी भागांमध्ये नागरिकांना स्वस्तात घरे उपलब्ध होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडून संयुक्तपणे ही योजना राबवण्यात येईल. लाइट हाउस प्रोजेक्टतंर्गत त्रिपुरा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड और तामिळनाडूत भूकंपविरोधी आणि पक्की घरे बांधली जातील. मध्यमवर्गासाठी घरे उभारण्यासाठी देशाला नवे तंत्रज्ञान मिळाले आहे.

लाइट हाउस प्रोजेक्ट देशातील घरबांधणी क्षेत्राला नवी दिशा दाखवणारे ठरतील. या प्रकल्पातंर्गत नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घरे तयार करण्यात येतील. ही घरे मजबूत आणि गरिबांसाठी आरामदायी असतील, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. कधीकाळी देशात निवास योजना हा सरकारसाठी प्राधान्याचा विषय नव्हता. मात्र, आता निवास योजना एखाद्या स्टार्टअप प्रमाणे काम करतील, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. लाइट हाउस प्रोजेक्टतंर्गत त्रिपुरा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड और तामिळनाडूत भूकंपविरोधी आणि पक्की घरे बांधली जातील.प्रकल्पासाठी खास तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. घरांसाठीचे बीम कॉलम आणि पॅनल कारखान्यातून थेट घर बांधायच्या ठिकाणी आणले जातील. त्यामुळे घरबांधणीसाठी लागणाऱ्या खर्चात मोठी कपात होईल. तसेच ही घरे भूकंपरोधी असतील.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *