या विषयावर मी रश्मी वहिनींना एक पत्र लिहिणार आहे: चंद्रकांत पाटील
मुंबई -
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपण मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. शिवसेना सामानाच्या अग्रलेखातून भाजपवर सतत टीका होताना दिसते. त्यातील भाषेवर आता भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे. औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर हा आमचा राजकीय मुद्दा नाही, तो आमचा श्रद्धेचा विषय आहे. तसेच निवडणुकीचा मुद्दा देखील नाही. अजूनही या देशात लोकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का? काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? अजूनही या देशात लोकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का? काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल तर औरंगजेबाचं नाव तरी कशाला? ते पहिले हटवा.
संभाजी महाराजांचे नाव हे संभाजीनगर शहराला असणे याबाबत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंपासून भूमिका होती. पाच सहा महिन्यांपूर्वी जेव्हा मी संभाजीनगर नामांतर व्हावे असे म्हटले होते तेव्हा सामनाने माझ्यावर अग्रलेख लिहिला होता असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. सामनामधून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला गेला होता. या विषयावर मी रश्मी वहिनींना एक पत्र लिहिणार आहे. तुम्ही संपादिका आहात अग्रलेख तुमच्या नावाने लागतो. आताही संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यावर जी भाषा वापरली तिथे रश्मी वहिनी असणारे संपादकीय असू शकत नाही ज्यावेळी हे गोधड्या भिजवत होते तेव्हा बाळासाहेबांनी मागणी केली होती असे ते म्हणाले होते. चांगले आहे मग बाळासाबेबांनी केलेली मागणी धरुन धरा. हा काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद असून आम्हाला यात पडायचे नाही असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

No comments
Post a Comment