Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग - नव्या वर्षातील चांगली बातमी! WHO ने दिली 'या' लशीला मंजुरी

No comments

       News24सह्याद्री - 




मागील २०२० हे वर्ष करोनाच्या संकटाशी दोन HAT करण्यात गेल्यानंतर आता नव्या वर्षात चांगली बातमी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने फायजर-बायोएनटेकने विकसित केलेल्या लशीला मंजुरी दिली आहे. करोनाला अटकाव करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून पहिल्यांदाच एखाद्या लशीला मान्यता देण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या या मंजुरीनंतर आता लशीच्या वापरासाठी जागतिक पातळीवर मार्ग खुला झाला आहे. याआधीच काही देशांनी फायजर-बायोएनटेकच्या लशीला मंजुरी दिली आहे. फायजरच्या लशीला जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिल्यामुळे ही लस गरीब देशांनाही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

आतापर्यंत ही लस अमेरिका आणि युरोपमध्येच उपलब्ध आहे. फायजरच्या लशीला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्यामुळे लस आयात करणे आणि लस वापरासाठी संबंधित देशातील नियामक प्राधिकरणांच्या मंजुरी प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेल्या  निकषांची पूर्तता फाजयर-बायोएनटेकची लस करत असल्याचे त्यांनी सांगितले. फायजर-बायोएनटेकच्या लशीला ब्रिटन, अमेरिका, युरोपीयन महासंघासह अनेक देशांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता कोरोनाला अटकाव करण्यासाठी लस लवकरच उपलभ होईल  मागील वर्षभर कोरोनाशी झगडत असताना नवीन वर्षात या लसीचा माध्यमातून अशेचा किरण दिसून येतोय. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *