Breaking News

1/breakingnews/recent

3 जानेवारी डिसेंबर सह्याद्री बुलेटिन

No comments

   News24सह्याद्री - जवानाच्या प्रसंगावधानमुळे मोठा अनर्थ टळला..जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES


1.  शिवसेना शाखा प्रमुखावर गोळीबार
दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रिव्हॉल्व्हरने दीपक म्हात्रे यांच्यावर तीन वेळा गोळीबार केला. मात्र सुदैवाने म्हात्रे यांनी गोळ्या चुकवल्याने त्यांना एकही गोळी लागली नसून ते थोडक्यात बचावले आहेत.

2. ट्रकखाली चिरडून एकाने गमावला जीव
मृतक पुरण बागडे हे नेहरू पार्क चौकातून जात असताना समोर येणारा ट्रक त्यांच्या निदर्शनास आला नाही. ट्रकच्या अगदी जवळ आल्याने ट्रकच्या हुकमध्ये त्यांचा शर्ट अडकून ते ट्रकच्या मागच्या चाकात आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते.

3. मोबाईल चोराच्या मागे धावताना जीवही गमवावा लागला असता
सीसीटीव्हीच्या सहाय्याने कल्याण जीआरपीने त्या चोरट्याचा शोध सुरू केला. पोलिसांना तपासात यश आले असून  24 तासाच्या आत मोबाईल हिसकावून पळणाऱ्या मारुती सकट याला अटक केली आहे.  

4. आता लेटलतिफांना सरकारचा चाप
राज्य सरकारने नवी नियमावली लागू केली आहे. यानुसार उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कापण्यापासून ते त्यांच्या सुट्ट्या कापण्यापर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.  राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने हे आदेश जारी केले आहेत.

5. जवानाच्या प्रसंगावधानमुळे मोठा अनर्थ टळला
 सोशल मीडियावर सध्या मुंबईच्या दहिसर रेल्वे स्टेशनचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये  चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडत असलेल्या एका ६० वर्षीय माणसाचा महाराष्ट्र पोलिसांच्या जवानानं जीव वाचवला आहे. शेवटच्या सेंकदाला या जवानाची नजर या माणसावर पडली आणि मोठा अनर्थ टळला.  

6. नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला मनसेचा विरोध
 मनसेने मात्र याला तीव्र विरोध केला आहे. या विमानतळाला रायगडचे प्रकल्पग्रस्त नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्या, अशी मागणी मनसेने केली आहे. त्यामुळे या विमानतळाच्या नामकरणावरून वाद निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

7. काँग्रेसने नामकरणाला विरोध केल्यामुळे महाविकास आघाडीवर परिणाम नाही
महविकास आघाडीत एकमत नसल्याचंही बोललं जात आहे. मात्र, काँग्रेसच्या विरोधाचा महाविकास आघाडीवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचं राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.  

8. अखेर चंद्रकांत पाटलांचे रश्मी ठाकरेंना पत्र
चंद्रकांत पाटलांनी रश्मी ठाकरेंना पत्र लिहले आहे. पत्रात दादा यांनी भाषेबद्दल तक्रार केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत भाजपावर टीका करीत आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी सामना बद्दल नाराजी व्यक्त केली आहे.  

9. औरंगाबाद नामांतराच्या मुद्यावरून प्रवीण दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा
संभाजीनगर असे औरंगाबादचे नामकरण करायचे असेल, तर महापालिका तुमची आहे, तिथे ठराव करा, राज्याच्या कॅबिनेटला निर्णय द्या, असे देखील दरेकर यांनी सांगितले आहे.

10. शिवसेनेच्या ईडी ऑफिसवरील मोर्चावरुन नितेश राणेंचे टीकास्त्र 
आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या शक्तीप्रदर्शनावरून निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केलीये

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *