Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - अग्निशमनबंब खरेदी बाबत मनपा बेफिकीर

No comments

News24सह्याद्री अग्निशमनबंब खरेदी बाबत मनपा बेफिकीर....पहा शहराची खबरबात


TOP HEADLINES

1. व्हीआरडीई परराज्यात स्थलांतरित होऊ देणार नाही - आ. जगताप 
नगरची खास ओळख असलेली लष्कराच्या अखत्यारितील सर्वात जुनी व मोठी तसेच अत्यंत महत्त्वाची असलेली वाहन संशोधन व विकास संस्था परराज्यात मी स्थलांतरीत होऊ देणार नाही. वेळप्रसंगी मोठा लढा उभारू असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्हीआरडीई च्या सर्व कर्मचाऱ्यांना दिला.आमदार संग्राम जगताप यांनी समस्त कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी व त्यावर अवलंबून असलेल्या स्थापनेतील कर्मचारी यांची भेट घेऊन या विषयी सविस्तर माहिती घेऊन या सर्व परिस्थितीवर चर्चा केली. यावेळी ते बोलत होते. दरम्यान व्हीआर डी ई च्या कर्मचाऱ्यांनी या निर्णयाला स्थगिती मिळण्याबाबत जातीने लक्ष घालून सरकारदरबारी पाठपुरावा करून यशस्वी प्रयत्न करण्याबाबत आमदार संग्राम जगताप यांना निवेदन दिले

2. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची आज आरोग्य तपासणी 
फायलींचा निपटारा करण्यासाठी मागील महिन्यापासून सुट्टीच्या दिवशी जिल्हापरिषदेच्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलवले जात आहे. मात्र आजच्या सुट्टीच्या दिवशी त्यांना कामासाठी नव्हे तर आरोग्य तपासणीसाठी बोलवण्यात आले आहे. तसा अध्यादेश सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे. दैनंदिन कामे करताना कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असा केवळ संदेश न देता मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी त्यांच्या आरोग्य तपासणीचा निर्णय घेतला त्यानुसार आज सकाळी 10 ते दुपारी एक दरम्यान जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांची थायराइड, शुगर, एचबी रक्त तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून तपासणी करून घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे

3. केडगाव ला दहा कोटी द्या - सभापती कोतकर
केडगाव हे नगर शहराचे एक मोठे उपनगर आहे. दिवसेंदिवस या उपनगराचा विस्तार वेगाने वाढत आहे. या भागातील नागरिकांची मूलभूत प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. रस्ते, लाईट ,ड्रेनेज अनेक प्रश्न प्रलंबित आहेत हे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी केडगावच्या विकासासाठी जिल्हा नियोजन शासनाकडून दहा कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी केली.

4. शिवभोजन केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांची ‘सरप्राईज व्हिजीट’

जिल्हाधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी काल अचानक महानगरपालिका क्षेत्रातील शिवभोजन केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. तसेच त्यांनी शिवभोजन केंद्रात जेवणासाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला आणि जेवण व्यवस्थित मिळते का, काही तक्रार नाही ना, याची विचारपूस केली. काल कोरोना लसीकरण सरावफेरीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भोसले बाहेर पडले. महानगरपालिकेच्या तोफखाना नागरी आरोग्य केंद्राची पाहणी केल्यानंतर त्यांनी शहरातील शिवभोजन केंद्राकडे मोर्चा वळवला. 

5. अग्निशमनबंब खरेदी बाबत मनपा बेफिकीर

कोणत्याही कारणाने आग लागल्यास ती तात्काळ नियंत्रणात आणण्यासाठी यंत्रणा सज्ज असावी लागते तशी खबरदारीही घेतली जाते. महापालिका मात्र याबाबत बेफिकर असल्याचं समोर आले. महापालिकेकडे दोनच अग्निशमन बंब आहेत तेही जुने झाले आहेत. नवीन वाहनांचा प्रस्तावही धूळखात पडून आहे. शहरात आगीची मोठी घटना घडल्यानंतरच महापालिकेला जाग येणार का असा सवाल यानिमित्तानं उपस्थित होतोय




No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *