9 जानेवारी सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - सुरत-हैदराबाद ग्रीनफिल्डसाठी बागायती जमीन जाणार ?..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. जिल्ह्यातील यलो अलर्ट जारी
पुढच्या 48 ते 72 तासात राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला बदललेलं वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे फळबागा शेतमालाचे नुकसान होईल अशी चिंता बळीराजाला पडलीये भारतीय हवामान विभागाने कुलाबा वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार 9 जानेवारीपर्यंत 12 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला यामध्ये अहमदनगरचा देखील समावेश आहे

2. व्हीआरडीई स्थलांतरास आमदार निलेश लंके यांचा विरोध
देशासह महाराष्ट्र राज्यामध्ये नगरची खास ओळख असलेली वाहन संशोधन व विकास संस्था व्हीआरडीई चेन्नईला हलविण्याच्या हालचाली सुरू झाली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी ही संस्था येथून हलविण्यात येऊ नये, यासाठी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी विरोध केला असून यामुळे १ हजार कामगार बेरोजगार होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन हे केंद्र स्थलांतरित करु नये अशी लेखी मागणी केली आहे.

3. कोरोना लसीची सराव फेरी उपजिल्हा रुग्णालयात यशस्वीरीत्या पूर्ण
करोना लस देण्याची सराव फेरी आज पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात यशस्वीरीत्या पूर्ण झाली. चालू महिन्यात ही लस देण्यात येणार असल्याची शक्यता असल्याने ही सरावफेरी उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्यवैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक कराळे व जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ञ् डॉ. चेतन खाडे यांच्या अधिपत्याखाली घेण्यात आली. ही लस कशा पद्धतीने द्यावी याचे प्रशिक्षण उपजिल्हा रुग्णालयातील पाच कर्मचाऱ्यांना या पूर्वीच देण्यात आले होते. ही लस उपलब्ध झाल्या नंतर सर्वात आधी हेल्थकेअर वर्कर्स,डॉक्टर,सिस्टर,वॊर्डबॉ य,सफाई कर्मचारी,सैनिक त्यांना ही लस दिली जाणार आहे. रुग्णाला जर लस दिल्या नंतर काही त्रास झाला तर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध असल्याची माहिती
मुख्यवैद्यकीय अधिकारी डॉ. कराळे यांनी दिली
4. पारनेर पोलिस व पत्रकार यांच्या वतीने मास्कचे वाटप
महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिना निमित्त पारनेर तालुका पत्रकार संघ व पारनेर पोलीस यांच्या वतीने पारनेर बस स्थानक परिसरात वाहन धारकांना मास्क व साबणाचे वाटप करण्यात आले.
यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीत जनजागृती सप्ताहात पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूक नियमांचा संदर्भात वाहनधारकांमध्ये जागृती करण्यात आल्याचे सांगितले .तसेच पारनेर येथील किसान इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांना समाज माध्यमांचा सुरक्षित वापर पारपत्र पडताळणीची पद्धती महिला व तरुणींची आत्म सुरक्षा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले

5. मतदान केंद्रावरील कामकाज हाताळतांना प्रशिक्षणाचा सदुपयोग करा - तहसीलदार
चंद्रे
कोपरगाव तालुक्यात २९ ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायत निवडणूकीत मतदान केंद्रावर कामकाज पाहणारे केंद्राध्यक्ष, सहाय्यक कर्मचारी असे ६६० लोकांना अंतिम प्रशिक्षण संत जनार्दन स्वामी आश्रम भक्त निवास येथे देण्यात आले. निवडणुक निरीक्षक तथा उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे यांनी मतदान केंद्राला भेट देवून पहाणी केली. मतदान केंद्रावरील कामकाज हाताळतांना प्रशिक्षणाचा सदुपयोग करा असे आवाहन तहसीलदार योगेंद्र चंद्रे यांनी यावेळी केले.

6. शनैश्वर देवस्थान अध्यक्षपदी बानकर
शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थान अध्यक्षपदी भागवत बनकर यांची तर उपाध्यक्षपदी विकास बानकर यांची सर्वानुमते निवड झाली. नूतन पदाधिकाऱ्यांचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी अभिनंदन केले. शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वर देवस्थान सभागृहात काल पदाधिकारी निवडीसाठी विश्वस्तांची बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षपदाच्या नावाची सूचना अप्पासाहेब शेट्टी यांनी केली.

7. कर्जतमध्ये भाजपला गळती सुरूच
कर्जत तालुक्यात भाजपची गळती सुरूच असून तीन नगरसेवकांपाठोपाठ जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षातील वाढत्या मतभेदांमुळे राजीनामा दिल्याचे समजते . भाजपचा जिल्हाध्यक्ष निवडताना झालेला संघर्ष या सर्व गोष्टींचा विचार करता खेडकर यांच्या राजीनामामागे ही पक्षातील अंतर्गत कलह असेल अशी शंका व्यक्त केली जात आहे .यापूर्वी कर्जतचे नगरसेवक बापूसाहेब नेटके, नगरसेविका मनीषा सोनमाळी तालुका उपाध्यक्ष सतीश पाटील, युवा नेते सचिन सोनमाळी यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

8. 'वर्कऑर्डर' अभावी कामे रखडली
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कारभारावर सदस्यांनी यापूर्वीही अनेकदा ताशेरे ओढले परंतु त्यात सुधारणा झाली नाही. आता बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनीही नाराजी व्यक्त केली. कामे मंजूर होऊनही वर्कऑर्डर का निघत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत स्थायी समिती सर्वसाधारण सभेत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली त्याचबरोबर त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले

9. शनिशिंगणापूरच्या ५० कोटीच्या प्रकल्पासाठी प्राधान्य - नूतन अध्यक्ष बानकर
स्वयंभू शनि मूर्ती वाहून आल्याचा इतिहास असलेल्या पानसनाला नदी सुशोभिकरण काम प्रगतीपथावर असून 50 कोटी रुपये खर्चाचे हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी अग्रक्रम राहील. या कामानंतर मुक्कामी राहणाऱ्या भाविकांची संख्या निश्चित वाढेल असे मत शनिश्वर देवस्थान ट्रस्टचे नूतन अध्यक्ष भागवत बनकर यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व जलसंधारण मंत्री शंकराव गडाख यांच्या संकल्पनेतून पानसनाला प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मार्च किंवा एप्रिलमध्ये या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्याच्या उद्देशाने काम पूर्ण करण्यास अग्रक्रम राहील असे बानकर यांनी सांगितले
10. सुरत-हैदराबाद ग्रीनफिल्डसाठी बागायती जमीन जाणार
केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी सुरत - हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग मंजूर केल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. त्यामुळे नगर जिल्ह्यात या बहुचर्चित महामार्गासाठी भूसंपादन होणार यावर शिक्कामोर्तब झाले. यामध्ये राहती घरे बागायती जमीन जाणार असल्याने त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. यासाठी राहुरी तालुक्यातील धानोरे सोनगाव ते राहुरी मुळाधरण बावीस किलोमीटर, राहुरी खुर्द ते डोंगरगण 18 किलोमीटर असे तब्बल 40 किलोमीटर साठी भूसंपादन होणार आहे. त्यात शेतकऱ्यांची घरे ,बागायती जमिनी जाताहेत, मुख्य सहापदरी रस्ता त्याच्या दुतर्फापट्टा दोन लेनच्या रस्ता प्रस्तावित आहे. जमिनीवर पंधरा फुटांवर महामार्ग होणार असल्याचे समजते. यापूर्वी के के रेंज मुळाधरण कृषी विद्यापीठ या प्रकल्पांसाठी जमीन संपादित झाल्या. पेट्रोलियम कंपनीचा डिझेल पेट्रोल वाहनांसाठी जमिनीचे हस्तांतरण झाले आता सुरत हैदराबाद महामार्ग साठी जमिनी संपादन होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत
No comments
Post a Comment