Breaking News

1/breakingnews/recent

पाच वरिष्ठ नेत्यांना मोदींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा: ममता बॅनर्जींना फोनही केला नाही पत्रही पाठवले नाही

No comments

 


दिल्ली -

५ जानेवारी हा दिवस अनेक राजकीय नेत्यांसाठी महत्वाचा दिवस आहे. ह्या दिवशी एक सोबत ५ राजकीय नेत्यांचा वाढदिवस असतो. कारण, या दिवशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह इतर विविध राजकीय पक्षांच्या पाच वरिष्ठ नेत्यांचे वाढदिवस असतो. या नेत्यांपैकी काही जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर काहींना शुभेच्छा पत्रे पाठवली. मात्र, ममता बॅनर्जींना मोदींनी शुभेच्छांसाठी फोन केला नाही की शुभेच्छा पत्रही पाठवले नाही.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आनंद शर्मा, डीएमकेचे नेत्या कनिमोळी, भाजपाचे दिग्गज नेते मुरली मनोहर जोशी आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते कल्याण सिंह यांचा ५ जानेवारी रोजी वाढदिवस असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन कल्याण सिंह यांना शुभेच्छा दिल्या तर जोशींना ट्विटद्वारे शुभेच्छा दिल्या. तसेच काँग्रेस नेते आनंद शर्मा यांना शुभेच्छा पत्र पाठवले. पंतप्रधानांनी पत्र पाठवल्याने शर्मा यांनी सुखद आश्चर्य व्यक्त केले. मात्र, मोदींनी ममता बॅनर्जींना शुभेच्छा देण्याचा विसर पडला.

ममता बॅनर्जी यांचा राजकीय प्रवास पाहिल्यास त्यांचा १५ वर्षांच्या असतानाच राजकारणात प्रवेश झाला. त्यांनी १५ व्या वर्षी जोगमाया देवी कॉलेजमध्ये विद्यार्थी परिषद संघटनेची स्थापना केली, जी इंदिरा काँग्रेस पक्षाची स्टुडंट विंग होती. या पक्षाने कम्युनिस्ट पक्षाच्या ऑल इंडिया डेमोक्रेटिक स्टुडंट्स ऑर्गनायझेशनला हरवलं होतं. याद्वारे त्यांनी पश्चिम बंगालच्या राजकारणात एका नव्या सुर्योदयाचा आभास करुन दिला होता.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *