Breaking News

1/breakingnews/recent

‘बॉब बिस्वास’चित्रपटासाठी अभिषेकने वाढवले १२ किलो वजन?

No comments


मुंबई -

गेल्या काही कित्येक वर्षापासून चित्रपटापासून दूर असलेला अभिनेता अभिषेक बच्चन पुन्हा एकदा प्रवाहात आला आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी अभिषेक मनापासून प्रयत्न करताना दिसत आहे. अभिषेक लवकरच ‘बॉब बिस्वास’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटासाठी तो प्रचंड मेहनत करत असून त्याने चक्क १२ किलो वजन वाढवल्याचे सांगण्यात येत आहे. अभिषेक लवकरच ‘बॉब बिस्वास’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. त्यामुळे या भूमिकेला न्याय देण्यासाठी तो अथक प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे या भूमिकेची गरज असल्यामुळे अभिषेकने त्याचे वजन १२ किलोने वाढवले आहे.

वजन वाढल्यामुळे अभिषेकच्या लूकमध्ये पूर्णपणे बदल झाला असून त्याला ओळखणंदेखील कठीण होत आहे. ‘बॉब बिस्वास’च्या सेटवरील अभिषेकचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर अभिषेकमध्ये झालेला बदल उघडपणे दिसून येत आहे. वजन वाढवण्यासोबतच अभिषेकने बंगाली भाषेचेदेखील धडे गिरवले आहेत. अभिषेकचा हा आगामी चित्रपट बॉब बिस्वास यांच्या जीवनावर आधारित आहे. २०१२ मध्ये आलेल्या कहानी या विद्या बालनच्या चित्रपटात बॉब बिश्वास हे काल्पनिक पात्र तयार करण्यात आले होते. याच पात्रावर आधारित ‘बॉब बिस्वास’ हा चित्रपट असल्याचं सांगण्यात येते. कहानी या चित्रपटात बॉब बिस्वास नावाचा एक कॉन्ट्रॅक्ट किलर होता. ही भूमिका श्वाश्वत चटर्जीने साकारली होती.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *