Breaking News

1/breakingnews/recent

ओबामा यांचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा

No commentsदिल्ली -

आज जे वॉशिंग्टनमधे घडले त्याची नोंद इतिहासात घेतली जाईल. असे ओबामा म्हणाले कॅपिटॉल इमारतीत घडलेल्या हिंसेची इतिहासात नोंद घेतली जाईल. हा हिंसा सध्या राष्ट्राध्यक्ष पदावर असणाऱ्या व्यक्तीने भडवल्याने झाली असून ही व्यक्ती कायदेशीर मार्गाने पार पडलेल्या निवडणुकांबद्दल सातत्याने खोटे आरोप करत आहे. ही घटना आपल्या देशासाठी लज्जास्पद आणि अपमानजनक आहे, अशा शब्दांमध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी कॅपिटॉलमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनाचा निषेध केला आहे. मात्र ही हिंसा अचानक घडलेली नसून ही चीड अनेक वर्षांपासून खदखदत होती आणि आता ती हिंसेच्या रुपात पाहायला मिळत आहे.  

आज कॅपिटॉलमध्ये घडलेले कृत्या अपेक्षित नव्हते आपण स्वत:चं हसे करुन घेण्यासारखा प्रकार ठरेल, अशा शब्दांमध्ये ओबामांनी अमेरिकन जनतेला मागील काही महिन्यांपासून सुरु असणाऱ्या राजकीय परिस्थितीचा हवाला देत आरसा दाखवला. आज राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्याने त्यांच्या समर्थकांनी धुडगूस घालत हिंसाचार केला. याच पार्श्वभूमीवर ओबामा यांनी फेसबुकवरुन या घटनेचा निषेध करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे.

मागील दोन महिन्यांपासून देशातील एक मोठा राजकीय पक्ष आणि त्याच्यासोबत असणारी प्रसारमाध्यम त्यांच्या पाठीराख्यांना सत्य दाखवण्यापासून दूर पळत आहेत. ही निवडणूक अटीतटीची झालेली नाही हे सत्य असून नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे २० जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहे. मात्र याला विरोध करणारे ज्या रंजक कहाण्या सांगत आहेत त्या गोल गोल फिरत असून सत्यापासून खूप दूर आहेत. मागील अनेक वर्षांपासून असलेली चीड या खोट्या दाव्यांच्या माध्यमातून समोर येत आहे. हीच चीड आणि त्याचे परिणाम आज आपल्याला हिंसेच्या रुपात दिसत असल्याचं ओबामा यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *