Breaking News

1/breakingnews/recent

19 जानेवारी Good Morning सह्याद्री

No comments

     News24सह्याद्री - ‘ट्रॅक्टर मोर्चा’वर शेतकरी ठाम....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES

1. आठ महिन्यांतील सर्वात कमी करोनाबळी

देशात करोनाचा फैलाव मंदावला असून, दैनंदिन रुग्णवाढ आणि करोनाबळींमध्ये मोठी घट होत असल्याचे दिसते. देशात गेल्या २४ तासांत करोनाचे १३,७८८ रुग्ण आढळले. दिवसभरात १४५ रुग्णांचा मृत्यू झाला. दैनंदिन करोनाबळींची आठ महिन्यांतील ही सर्वात कमी संख्या आहे.   देशातील एकूण रुग्णसंख्या एक कोटी पाच लाखांहून अधिक असली तरी सध्या दैनंदिन रुग्णसंख्या सातत्याने घटत आहे. १२ जानेवारी रोजी देशातील रुग्णसंख्या १२,५४८ इतकी नोंदविण्यात आली होती.  

2. ‘नवे धोरण मान्य नसल्यास व्हॉट्सअ‍ॅपचा वापर टाळा’
व्हॉट्सअ‍ॅपचे नवे गोपनीयता धोरण स्वीकारणे ही ऐच्छिक बाब आहे, एखाद्या व्यक्तीला त्यांच्या अटी आणि शर्ती मान्य नसतील तर ती व्यक्ती त्याचा वापर न करण्याचा अथवा त्या व्यासपीठामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेऊ शकते, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. व्हॉट्सअ‍ॅप हे खासगी अ‍ॅप आहे, ती ऐच्छिक बाब आहे, पटत नसल्यास ते स्वीकारू नका, दुसऱ्या पर्यायाचा वापर करा, असे न्या. संजीव सचदेव यांनी याचिकाकर्त्यां वकिलास सांगितले.
  
3.  ‘ट्रॅक्टर मोर्चा’वर शेतकरी ठाम
प्रजासत्ताक दिनी ‘ट्रॅक्टर मोर्चा’ काढण्यावर आंदोलक शेतकरी ठाम आहेत. मात्र, त्यांना दिल्लीत प्रवेश देण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिल्ली पोलिसांना असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
शांततेने ट्रॅक्टर मोर्चा काढणे हा शेतकऱ्यांचा घटनात्मक अधिकार आहे, असे शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सांगितले. प्रजासत्ताकदिनी काढण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर मोर्चात हजारो शेतकरी सहभागी होतील, असा विश्वासही या नेत्यांनी व्यक्त केला. तर दुसऱ्या बाजूला, शेतकऱ्यांचा प्रजासत्ताक दिनाचा ट्रॅक्टर मोर्चा हा कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा असून, देशाच्या राजधानीत कुणाला प्रवेश द्यायचा, याचा निर्णय घेण्याचा अधिकार प्रथम दिल्ली पोलिसांना असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले.
    
4. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य
माझ्या हाती राज्याचं स्टेअरिंग भक्कम आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मध्ये मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत, पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही असंही सूचक विधान यावेळी त्यांनी केलं. परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ३२ व्या राज्य रस्ता सुरक्षा महिन्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्यातील अपघातग्रस्त जागा, वळणे लक्षात घेऊन अशा ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्यात यावी असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.  
  
5. सोलापूर भाजपमध्ये गटबाजी शिगेला
सोलापूर महापालिकेचे वादग्रस्त उपमहापौर राजेश काळे यांना पोलीस कोठडीची हवा खावी लागत आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपने शेवटी नाइलाजास्तव का होईना, त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. अशा कठोर कारवाईचा बडगा केवळ उपमहापौर काळे यांच्यापुरता उगारला म्हणजे भाजपमध्ये सर्व काही ठिकठाक आहे, असे समजण्याचे कारण नाही. किंबहुना काळे यांच्या विरोधात झालेली ही कारवाई सोलापूरच्या भाजपमधील वाढत्या बेशिस्तीचे, गोंधळाचे आणि उबग येईल अशा कमालीच्या गटबाजीचे हिमनगाचे टोक म्हणायला हवे.

6. रायगड जिल्हा रुग्णालयाची इमारत धोकादायक
भंडारा येथील दुर्घटनेनंतर राज्यातील जिल्हा रुग्णालयांच्या सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व रुग्णालयांना अग्निशमन यंत्रणांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट २०२० मध्ये करण्यात आले असले तरी रुग्णालयाची इमारत बांधकाम जीर्ण आणि धोकादायक बनत चालली आहे. त्यामुळे रुग्णालयाची ही इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याची मागणी जोर धरू लागली आहे.  

7. सदनिका विकण्याच्या नावाखाली २७ जणांची फसवणूक
नालासोपारा पश्चिम परिसरात दोन विकासकांनी सदनिका विकण्याच्या नावाखाली तब्बल २७ ्रग्राहकांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात नालासोपारा पोलीस ठाण्यात या विकासकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 
 8. धनंजय मुंडे यांच्याविरोधात धरणे आंदोलन  
 राज्य सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आज भाजप महिला आघाडी तर्फे अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलेय.राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या या कृत्यामुळे राज्यातील महिला असुरक्षित आहेत. त्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन, राजीनामा द्यावा, किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी ही भाजप महिला आघाडीने केली आहे. यावेळी धनंजय मुंडे यांच्याविरोधात सर्वांनी नारेबाजी केली. यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेय.  
  
9. आठवडी बाजाराचे श्री संत शिरोमणी सावता महाराज  नावाने  लोकार्पण
गंगापूर शहरातील नागरिकांनी विकासासंदर्भात जी मागणी केली, ती आम्ही प्राधान्याने पूर्ण केली. जनतेला ईश्‍वराचा अंश मानत आम्ही त्यांची सेवा केली. या परिसराचा विकास केला. ज्या विश्‍वासाने नगर परिषदेची सत्ता आपण भाजपाच्या हाती सोपविली, त्या विश्‍वासाला जागत आम्ही गंगापूर शहराला विकासाच्या मार्गावर अग्रेसर केले. या पुढील काळातही विकासाचा हा रथ अधिक वेगाने पुढे नेत
गंगापूर  शहराच्या विकासासाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत झटेन, असे प्रतिपादन आठवडी बाजाराच्या लोकार्पण व लोकशाहीर आण्णा भाऊ साठे प्रवेशद्वार उद्घाटन सोहळ्यात बोलतांना नगरसेवक तथा नगराध्यक्षपती प्रदीप  पाटील यांनी केले.
  
 10. जालना औद्योगिक वसाहत येथील मेटारोल कंपनीत स्फोट
जालना एमआयडीसी मधील मेटारोल कंपनी मध्ये भट्टीचा स्फोट होऊन एक मजूर भाजून जागीच ठार झाल्याची घटना घडलीये तर दुसरा एक मजूर  गंभीर जखमी असून त्याला  खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलय तर  या अपघातात   6/7 मजूर  जखमी असल्याची माहिती आहे  
   

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *