Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - जिल्हा बँक निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, एकत्र येणार

No comments

   News24सह्याद्री  जिल्हा बँक निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, एकत्र येणार....पहा शहराची खबरबात


TOP HEADLINES


1. जिल्हा बँक निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, एकत्र येणार
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष स्वतंत्र पॅनल उभा करण्याची शक्यता आहे याबाबत नुकतेच खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सूचक वक्तव्य केले होते राष्ट्रवादी काँग्रेसची ही बैठक होऊन रणनीती ठरविण्यात आलीये त्यात  शिवसेना व काँग्रेसला सोबत घेऊन राज्यातील आघाडी येथेही कायम ठेवण्याची तयारी सुरू असल्याचे समजते त्यामुळे आगामी काळात शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी या आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होण्याची चिन्हे आहेत.

2. कोरोना लसीकरण पूर्णपणे सुरक्षित नगर मध्ये डॉ. म्हैसेकर यांची माहिती
कोरोना लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आहे. कोणतीही लस अथवा इंजेक्शन घेतल्यानंतर किरकोळ प्रमाणात ताप, अंग दुखणे, मळमळ होणे आदी लक्षणे जाणवतात.त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. लसीकरणावेळी जिल्ह्यात चार आरोग्य कर्मचाऱ्यांना जाणवलेली लक्षणे याचप्रकारची होती. त्यामुळे कोणताही गैरसमज या लसीकरणाविषयी नको, असे राज्य शासनाचे कोविड सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.  जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात डॉ. म्हैसेकर यांनी कोरोनाविषयक बाबींचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

3. २६ जानेवारीला अहमदनगरमधे 'ट्रॅक्टर तिरंगा रॅली'
महाराष्ट्रातील शेतकरी कामगार संयुक्त मोर्चाची बैठक दि.१२ जानेवारी रोजी मुंबई येथे पार पडली. त्यामधे २३ ते २६ जानेवारीला मुंबईत आझाद मैदान येथे महापडाव आणि ध्वजवंदन करण्याचे ठरवले आहे. ज्यांना तेथे जाणे शक्य नाही त्यांनी आपापल्या गावी, वाडी, वस्ती व शेतात आपल्या ट्रॅक्टरला तिरंगा लावून मी दिल्ली येथील शेतकरी आंदोलकांसोबत आहे. असे सरकारच्या निदर्शनास आणून द्यावे. येथे आज झालेल्या बैठकीत २६ जानेवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आणि अहमदनगर शहरात सकाळी ११ वाजता एसटी स्टँड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ट्रॅक्टर तिरंगा रॅलीची सुरूवात होईल.
 
4. रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ  
वाहन चालवताना सीटबेल्ट लावल्यास, तसेच हेल्मेट परिधान केल्यास रस्ता अपघातादरम्यान होणारी जीवित हानी निश्चित टळू शकते, असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी केले. भारत सरकारच्या सडक परिवहन मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्व. रामलालजी ललवाणी मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने स्वयंप्रेरणेने सीटबेल्ट लावणाऱ्या व हेल्मेट वापरणाऱ्या वाहनचालकांचा गुलाबपुष्प व नव वर्षाचे पॉकेट कॅलेंडर देऊन रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी पाटील बोलत होते.  
 
5. जिल्हा सहकारी बँकेसाठी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात
जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरूवात होत आहे. याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी दिली आहे.
येत्या 25 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वेळ असल्याचे सांगण्यात आले. बँकेच्या 21 संचालकांच्या जागांसाठी येत्या 20 फेबु्रवारीला मतदान होणार आहे.

6. नगर जिल्ह्यातूनच बाळासाहेब थोरातांपुढे नवे संकट
काँग्रेसचे नगर शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी मनोज गुंदे यांची नियुक्ती केली आहे. शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी प्रदेशाध्यक्ष थोरातांच्या मान्यतेने ही नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. त्यावरून वाद पेटला आहे. भुजबळ यांच्या समर्थकांनी बैठक घेऊन याबद्दल नाराजी व्यक्त केली.
भुजबळ यांना हटविण्यामागे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांचे व्यक्तीद्वेषाचे राजकारण असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला
 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *