मोठी बातमी - सुशांत सिंह राजपूतच्या भावावर अज्ञातांकडून गोळीबार
News24सह्याद्री -
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबियांना आणखी एक धक्का बसला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या भावाला भरचौकात गोळ्या घालण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सुशांत सिंह राजपूत चा मावस भाऊ राजकुमार सिंह आणि त्याच्या एका सहकार्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या. या गोळीबारात ते दोघेही गंभीर जखमी झाले असून राजकुमार यांचा सहकारी अली हसन याची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र त्यांच्यावर हल्ला करणारे आरोपी अद्याप फरार आहेत. सुशांत सिंह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह हा यामाहा मोटरसायकल शोरूमचा मालक आहे. ते रोज मधेपुरा येथील शोरूम उघडण्यासाठी जात असायचे. नेहमीप्रमाणे ते मधेपूरा येथील शोरूम उघडण्यासाठी जात असताना त्यांच्यावर हा गोळीबार झाला. दरम्यान या गोळीबारात राजकुमार सिंह यांच्या सहित त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले आहे.
No comments
Post a Comment