Breaking News

1/breakingnews/recent

9 जानेवारी Good Morning सह्याद्री

No comments

News24सह्याद्री - महाआघाडीचे सरकार पाच वर्ष चालावे - प्रकाश आंबेडकर....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES


1. लोकलचा निर्णय मंगळ
वापर्यंत

गेल्या मार्चपासून बंद असलेली मुंबईची उपनगरी लोकल सेवा सर्वासाठी सुरू करण्याबाबतचा निर्णय येत्या मंगळवारपर्यंत घेण्यात येईल, असे राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी काल उच्च न्यायालयात सांगितले. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत नसलेल्या उपनगरांतील लाखो प्रवाशांना लवकरच दिलासा मिळणार आहे. उच्च न्यायालयासह कनिष्ठ न्यायालयेही पूर्ण क्षमतेने सुरू झाली असल्याने वकिलांनाही लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी करणारी याचिका वकिलांच्या संघटनेने दाखल केली आहे.  
-----------

2. भंडाऱ्यात नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग, दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्राच्या काळजाचं पाणी करणारी घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. धुरामुळे गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचं समजतं. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे.  

----------
3. ३५ फिर्यादीचे चोरीला गेलेला ४५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी दिला मिळवून 
पोलीस रेझिंग डे अंतर्गत २ जानेवारी ते ८ जानेवारी सप्ताह असल्याने डोंबिवलीतील ४ पोलीस स्थानकाअंतर्गत एकूण ३५ फिर्यादीचा ४५ लाखांचा चोरीला गेलेला मुद्देमाल नागरिकांना परत देण्यात आला. यावेळेस चार ही पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस पोलीस आयुक्त जे .डी. मोरे  यांच्या हस्ते या मुद्देमालाचे वाटप करण्यात आले. भविष्यात आपल्या दागदागिने मुद्देमाल याची काळजी नागरिकांनी ही घेतली पाहिजे असं मत एसीपी मोरे यांनी यावेळी व्यक्त केले.
---------
4. कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनला सुरुवात 
महाराष्ट्र मध्ये सर्व जिल्हा व २५ महानगरपालिका मध्ये कोविड लसीचे ड्राय रन सुरू करण्यात आले आहे. कल्याण- डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दोन ठिकाणी ड्राय रन झाले आहे. सरकार ने दिलेल्या नियमानुसार फक्त २० जणांवर ड्राय रन करणार असून यामध्ये सर्वात प्रथम आरोग्य कर्मचारी यांना लस  देण्यात आली आहे. या लसीकरणासाठी वेटिंग रूम, कोविड वॅक्सिंलेशन रूम,आणि ओब्जर्वशन रूम अशा तीन वेगवेगळ्या रूम तयार केल्या गेल्या आहेत.
-------
5. अकोल्यात २०२१ क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन
अकोला महानगरात गेल्या चार वर्षापासून क्रिकेट स्पर्धा आयोजित करणाऱ्या समिती कडून यावर्षीही अकोला प्रीमियर लिगचे आयोजन करण्यात आले आहे. अली फाउंडेशनच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमांचे संकेत पाळीत क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. ११ दिवसापर्यंत चालणाऱ्या साखळी क्रिकेट टूर्नामेंट मध्ये अकोला जिल्ह्यातील नामवंत ८ क्रिकेट चमू सहभागी होणार असल्याची माहिती मुनकीर खान यांनी पत्रकार परिषदेत दिली.अकोला प्रीमियर लिग सीजन १ चा प्रारंभ हा शास्त्री स्टेडियम मध्ये ४ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहेत,केवळ अकोला जिल्ह्यातील ८ क्रिकेट समूह या स्पर्धेत सहभागी होणार असून त्यांची नोंदणी १० जानेवारी पासून ते १७ जानेवारी पर्यंत होणार आहे. 
-------------
6. स्मशानभूमीतील लोखंडी गेट पडण्याची शक्यता;नागरीकांच्या जिवीतास धोका
उल्हासनगर कँम्प.नंबर चार येथील मुक्ती बोध स्मशानभुमीतील लोखंडी गेट पडण्याच्या स्थीतीत असुन त्याठिकाणी जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्मशानभूमीचे ट्रस्टी या गंभीर बाबीकडे लक्ष देत नसल्याने जनतेत संताप व्यक्त केला जात आहे. सदरचे लोखंडी गेट त्वरीत बदलुन त्याठिकाणी नवीन गेट बसविण्याची मागणी माजी उपमहापौर तथा शिवसेनेचे जेष्ट नगरसेवक रमेश चव्हाण यांनी केली.
----------
7. बँकेतील कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा; शेतकऱ्यांचे अनुदान मिळेना 
गंगापूर तालुक्यातील सिध्दनाथ वाडगांव येथील मध्यवर्ती बँकेत कर्मचाऱ्यांअभावी अनूदान प्राप्त करण्यासाठी शेतकरी खातेदारांना हेलपाटे मारावे लागत आहे. कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून शेतकऱ्यांचे अतीवृष्टीचे जमा असलेले अनूदान तत्काळ वाटप करण्याची मागणी बळीराजा मधून करण्यात येत आहे. या बँकेत खातेदारांना रोकड दुपार नंतरच मिळते बँक ऊघडण्याची वेळ साडे दहा असताना दररोज अकरा वाजल्यानंतरच बँक ऊघडण्यात येते त्याच प्रमाणे येथील कर्मचारी ग्राहकांना वेळेवर सेवा देत नसल्याने ग्राहकामधे प्रंचड रोष निर्माण होत आहे. त्यामुळे अतीवृष्टीचे जमा असलेले अनूदान त्वरित वितरण करण्याची मागणी बळीराजा व ग्राहक करत आहेत. 
---------
8. महाआघाडीचे सरकार पाच वर्ष चालावे - प्रकाश आंबेडकर 
 राज्यातील महाविकास आघाडीतील असलेला वाद यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर त्यांनी औरंगाबाद व संभाजी महाराजचा संबंध नाही. काँग्रेस व शिवसेना यांच्यात भांडण होऊ नये. ही आमची भूमिकाआहे,असे ते म्हणाले. महाआघाडीचे सरकार पाच वर्ष चालावे,त्यांच्यात टोकाची भांडणे होवू नये, म्हणून वंचितने हा तोडगा मांडला होता. सेनेने हा तोडगा मान्य करावा, प्रेसटीज इश्यू करू नये,असा सल्ला त्यांनी शिवसेनेला दिला. अशीच धुसफूस राहिली तर कॉन्ग्रेसला मुस्लिम वोट बँक आहे, शिवसेनेला हिंदु वोट बँक आहे.आपल्या वोट बँक सांभाळण्याच्या नादात सरकार जाऊ नये,असा इशारा त्यांनी दिला आहे. 
----------
9. जिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाचे ड्राय रन सुरु 
धुळे जिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाचे ड्राय रन जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी लसीकरणाच्या ड्राय रन साठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात 4 ठिकाणी लसीकरणाचे ड्राय रन पार पडले. मार्च महिन्यापर्यंत जिल्ह्याला लस उपलब्ध होण्याची शक्यता असून पहिल्या टप्प्यात 9 हजार आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात येणार असून लसीकरणाबाबत जिल्ह्यात जनजागृतीपर मोहीम राबविण्यात येणार आहे. या लसीकरणाच्या ड्राय रनची जिल्हाधिकारी संजय यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी वानमती सी,पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित यांनी पाहणी केली.
----------
10. जालन्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अधिपरिचारक व नर्सिंग स्टाफ यांनी कोरोना महामारीच्या काळात कोरोना रूग्णाची सेवा इमाने इतबारे केली मात्र त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्तीचे आदेश देण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी असला तरी जागतिक आरोग्य संघटनेने कोणतेही पाऊल उचलले नाही त्यामुळे आम्हाला परत कामावर रुजू करून घ्या अशी मागणी कंत्राटी कर्मचार्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदनही जिल्हाधिकारीयांना देण्यात आले आहे. आमच्या मागण्या जर मान्य न झाल्यास १२ जानेवारी रोजी बेमुदत आंदोलनाचा इशारा त्यांनी यावेळी दिला
------- 



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *