24 जानेवारी Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडला अखेर पोलिसांची परवानगी...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडला अखेर पोलिसांची परवानगी
शेतकऱ्यांना आउटर रिंग रोडवर एकत्रित मोर्चा करायचा होता, मात्र त्याऐवजी दिल्लीतल्या अंतर्गत रस्त्यांवर मर्यादित प्रवेशाला परवानगी देण्यात आली आहे. सर्व सीमांवरचे ट्रॅक्टर एकत्रित येणार नाहीत तर जिथपर्यंत परवानगी दिली आहे तिथून ते आपापल्या ठिकाणी परत माघारी जाणार आहेत.
2. लालू प्रसाद यादव दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल
लालू प्रसाद यादव यांची प्रकृती ढासळत चालल्याने चांगले उपचार मिळावेत यासाठी लालू प्रसाद यादव यांना तातडीने दिल्लीच्या एम्स रूग्णालयात हलवण्यात आलंय. लालू यांना रूग्णवाहिकेने बिरसा मुंडा विमानतळावर नेण्यात आलं. तेथून हवाई रूग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना दिल्लीला नेण्यात आलं आहे.
3. एल्गार परिषदेला अखेर परवानगी
एल्गार परिषदेला परवानगी मिळावी यासाठी कोळसे पाटील यांनी स्वारगेट पोलिसांकडे अर्ज केला होता. मात्र, करोनाचे संकट पाहता एल्गार परिषदेला परवानगी नाकारण्यात आली होती. अखेर या एल्गार परिषदेला परवानगी मिळाली आहे
4. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उल्हासनगरात मोठ्या उत्साहात साजरी
उल्हासनगर शहर शाखेच्या वतीने कँम्प.नंबर एक ते पाच परीसरात भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असुन सतत सात दिवस संपन्न होणा-या या भगव्या सप्ताहात रक्तदान शिबीर,आरोग्य शिबीर,निराधार,गरीब व गरजु महिलांना मोफत शिलाई मशिनचे वाटप, तसेच जिवनावश्यक वस्तूचे वाटपही यावेळी करण्यात येणार असल्याचे जेष्ठ शिवसैनिक दिलीप गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
5. रद्द केलेली लोकल सुरू करा - मनसे
शहर अध्यक्ष कुणाल भोईर यांनी रेल्वे प्रबंधकांना एका निवेदनाद्वारे केली आहे. लोकल रद्द केल्याने अत्यावश्यक सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्वरीत ही लोकल सुरु करा. अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने निवेदनाद्वारे दिला.
6. परभणीत प्लेइंग क्युबद्वारे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे चिञ साकारुन केली जयंती साजरी
दहावीतील विध्यार्थ्याने एक हजार प्लेइंग क्युबद्वारे पाच बाय सात फुटामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे चिञ साकारले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्रातील हे प्लेइंग क्युबद्वारे साकारलेले चित्र ही पहिलीच घटना आहे.
7. परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेने चोरीला गेलेल्या 16 दुचाक्या केल्या जप्त
स्थानिक गुन्हा शाखेच्या एका पथकाने पालम येथे सदर आरोपींच्या घरी छापा टाकून त्या 11 दुचाकी जप्त केल्या आहेत. सदरची कारवाई परभणी पोलीस अधीक्षक जयंतमीना यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव तडस व पथकाने केली.
8. शेतकरी जागर मंचच्या वतीने अकोल्यात ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन
हुतात्मा स्मारक येथून निघणाऱ्या या रॅलीचे नेतृत्व महिला शेतकरी करणार असल्याची माहिती शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे यांनी दिलीये. तसेच ट्रेकटर वरील जी.एस.टी रद्द करावा, त्या सोबतच शेती साठी लागणारे साहित्यावरील जी एस टी ही रद्द करण्यात यावा,अशी मागणी शेतकरी जागर मंचचे ज्ञानेश्वर सुलताने यांनी केली आहेय. अकोल्यातील शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत ते बोलत होतेय.
9. वडगाव परिसरात चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला
चिमुकलीच्या अपहरणानंतर आजीने आरडा-ओरडा केल्याने अपहरणकर्त्याने तिला सोडून पळ काढल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक सतीश पंडीत व त्यांच्या सहकाºयांनी घटनास्थळी भेट देऊन फरार अपहरणकर्त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
10. वाळूजला २२ हजाराचा गुटखा पकडला
कारवाईत पोलिसांनी १३० रुपये किमंतीचे हिरा पान मसाल्याचे १४ हजार ३०० रुपये किमंतीचे ११० पुडे व रॉयल ७७७ सुंगधीत तंबाखुचे प्रत्येकी ७० रुपये किमंत असलेले ७ हजार ७०० रुपये किमंतीचे ११० पुडे जप्त केले आहे. या प्रकरणी अन्न व औषधी प्रशासनाच्या अन्न व सुरक्षा अधिकारी मेघा फाळके यांच्या फिर्यादीवरुन आरोपी मोहिन पठाण याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप गुरमे हे करीत आहेत.
No comments
Post a Comment