शहराची खबरबात - महापालिका आयुक्त पदाचा जिल्हाधिकार्यांकडे भार
News24सह्याद्री - महापालिका आयुक्त पदाचा जिल्हाधिकार्यांकडे भार...पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES
1. तंत्रज्ञान मिळाले तर नगर शहर घेईल झेप
अहमदनगर महापालिकेत तांत्रिक मनुष्यबळाची कमतरता आहे महापालिकेला तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास नगर शहर झेप घेईल हाच नगर शहराच्या विकासाचा मंत्र आहे असे महापालिका आयुक्त श्रीकांत माइकल वार यांनी सांगितले
2. महापालिकेने केली 50 कोटींची वसुली
वर्षभरात महापालिकेने 50 कोटींची मालमत्ता कर वसूल केली त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत 50 कोटींचा निधी जमा झाला आहे आणि ती महापालिका कसा खर्च करते याकडे आता नगरकरांची लक्ष लागले आहे
3. महापालिका आयुक्त पदाचा जिल्हाधिकार्यांकडे भार
महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार सेवानिवृत्त झाले त्यामुळे महापालिकेचा अतिरिक्त पदभार अधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्याकडे सोपविण्यात आला या संदर्भातील आदेश नगर विकास विभागाने काढले यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे व राहुल दिवेदी यांनीही महापालिका आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार पाहिला आहे या काळात त्यांनी नगर शहरात भरीव कामगिरी केली होती विशिष्ट म्हणजे राहुल दिवेदी यांच्या काळात महापालिकेने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते
4. यापुढे रस्त्यावर मोकाट जनावरे सोडणे पडणार महागात
महापालिकेच्या कोंडवाडा विभागाच्या या विभागाने जर रस्त्यावर मोकाट जनावरे पकडले व त्यानंतर जर संबंधित मालकाने जागेवरच जनावर सोडवले नाही तर ंबंधितास त्या जनावरास केल्या जाणार्या दंडाच्या पाचपट दंड वसुली करण्यात येणार आहे या पथकाने पकडून आनलेले जनवारे जर सात दिवसांच्या आत त्या मालकांनी सोडवून नेले नाही तर या जनावरांचा लिलाव केला जाणार आहे तरी यापुढे कोणीही रस्त्यावर मोकाट जनावरे सोडू नये असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे
5. नगरच्या वाहतूक शाखेला नव्या 25 पोलिसांचे बळ
वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षक पदी नुकतेच रुजू झालेले विकास देवरे हे वाहतुकीचे योग्य नियम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आता पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास नक्की मदत होणार आहे
No comments
Post a Comment