1 जानेवारी सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून १२ मुले दिली पालकांच्या ताब्यात...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
छाननी प्रकिया वेळी राज्य निवडणूक आयोग नियुक्त निवडणूक निरीक्षक तथा उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे उपस्थित होत्या.
2. न्यायवैद्यकशास्त्राचे पहिले डिजिटल संग्रहालय
प्राध्यापक डॉक्टर संदीप कडू यांनी भारतामधील न्याय वैद्यक शास्त्राचे पहिले डिजिटल म्युझियम साकारले आहे त्यांच्या यशस्वी प्रयोगाला पेटंटही मिळाले आहे पोलिसांपासून वकील व न्यायाधीशांनाही हे संग्रहालय मार्गदर्शक ठरणार आहे
3. लष्करी सरावासाठी २५ हजार हेक्टर जमीन अधिसूचना क्षेत्र
पाच वर्षांनी अशी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येते. या अधिसूचनेमुळे सराव क्षेत्रात, तेथील दैनिंदिन व्यवहारात कोणताही बदल होणार नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
पाच वर्षांनी अशी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येते. या अधिसूचनेमुळे सराव क्षेत्रात, तेथील दैनिंदिन व्यवहारात कोणताही बदल होणार नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
4. कुकडी डाव्या कालव्याला आठ दिवसात पाणी सोडणार
लामखडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आमदार निलेश लंके यांची भेट घेतली. यावेळी लामखडे व शिष्टमंडळातील पदाधिकार्यांनी निघोज व परिसरातील गावांतील पाण्याची टंचाई कशाप्रकारे आहे याची माहिती दिली.
लामखडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आमदार निलेश लंके यांची भेट घेतली. यावेळी लामखडे व शिष्टमंडळातील पदाधिकार्यांनी निघोज व परिसरातील गावांतील पाण्याची टंचाई कशाप्रकारे आहे याची माहिती दिली.
5. नगर जिल्ह्यातील या रस्त्यांचे भाग्य उजाळणार रस्त्यासाठी तब्बल 19 कोटी मंजूर
कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी त्यांच्या मतदार संघातून जाणारा हा रस्ता असल्याने या कामासाठी 19 कोटीचा निधी मंजूर करून आणला. या कामाची निविदा देखील प्रसिध्द झाली आहे
कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी त्यांच्या मतदार संघातून जाणारा हा रस्ता असल्याने या कामासाठी 19 कोटीचा निधी मंजूर करून आणला. या कामाची निविदा देखील प्रसिध्द झाली आहे
6. श्रीरामपूर पालिकेच्या प्रवेशद्वारावर काँग्रेसने केली भाजी विक्री
नगरपालिकेतील विरोधी काँग्रेस पक्षाने पालिकेसमोर भाजीची विक्री करत आंदोलन केले पालिकेच्या आडमुठेपणामुळे भाजी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यांचा व्यवसाय बंद पडला आहे त्यामुळे तातडीने नेहरू मंडइ सुरू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली
7. राहुरी अशी होते दुधात भेसळ, अन्न औषध प्रशासनाने केली पोल खोल
भेसळयुक्त दूध व दूध भेसळीच्या रसायनांचा तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच दूध केंद्र सील करून दूध केंद्राचा परवाना त्वरित निलंबित करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांनी दिली
साईबाबा संस्थान अनोख्या पद्धती ने साईभक्तांचं स्वागत करत असल्याचं पाहायला मिळाला शिर्डीत दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे शिर्डीत आगमन होताच त्यांचे स्वागत वाहनांना वेलकम टू शिर्डी असे स्टिकर लावून करण्यात येत आहे
9. कर्जत मध्ये वाळूतस्कर पिस्तुलासह अटक
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांचे पथक रात्री गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली
10ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून १२ मुले दिली पालकांच्या ताब्यात
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने ऑपरेशन मुस्कान राबून बारा मुलांचा शोध घेत त्यांना पालकांच्या स्वाधीन केले पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन शिर्डीत राबविण्यात आले

No comments
Post a Comment