Breaking News

1/breakingnews/recent

1 जानेवारी Good Morning सह्याद्री

No comments

    News24सह्याद्री -जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेसाठी भारत सज्ज......पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


1. फास्टॅगच्या मार्गिकेतून गेल्यास वाहनचालकांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या रस्त्यावरील टोलप्लाझांवर याची अंमलबजावणी केली जाईल. वाहनांवर फास्टॅग नसूनही फास्टॅगच्या मार्गिकेतून गेल्यास वाहनचालकांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे.

2. जगातील सर्वात मोठय़ा लसीकरण मोहिमेसाठी भारत सज्ज 
राजकोट येथील नव्या ‘एम्स’चा पायाभरणी समारंभ मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे पार पडला त्यावेळी ते बोलत होते. जगातील सर्वात मोठय़ा लसीकरण मोहिमेसाठी भारत सज्ज असल्याचा विश्वासही या वेळी पंतप्रधानांनी व्यक्त केला.  

3. ‘मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही’
शेतमालाला किमान आधारभूत दर आणि मंडी पद्धत याबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा शेतकऱ्यांचा ठाम निर्धार असून त्यासाठी वर्षभर आंदोलन करावे लागले तरी बेहत्तर, असेही त्यांचे म्हणणे आहे. सरकार जोपर्यंत मागण्या मान्य करीत नाही तोपर्यंत नववर्षांचे स्वागत नाही, असेही शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

4. तीन नव्या पोलीस ठाण्यांची निर्मिती
दुसरीकडे नव्या आयुक्तालयात १ हजार ४८८ पोलिसांची पदे रिक्त असून शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यात तसेच गुन्ह्यंचा तपास करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे.

5. जिल्हा परिषदेत अधीक्षकांना धक्काबुक्की
शिवजी नगर पोलिस स्टेशन मधे दिल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल घड़लेल्या या घटनेचा निषेध काळ्या फीती लाउन् करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या वीवीध संघटनानी या घटनेचा निषेध केला आहे.

6. निवडणूक कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही   करा 
उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण.निर्माण झाले असून नामनिर्देशन पत्र अपात्र करून निवडणूक कामात हलगर्जीपणा करणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

 7. शहीद कैलास दहीकर यांच्या कुटुंबाला 2 लाख 51 हजार रुपयांचा  धनादेश सुपूर्द  
खासदारकीचा पगार शहीद कैलास दहीकर यांच्या कुटुंबाला 2 लाख 51 हजार रुपयांचा पगार देण्यात आला,यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सैनिक कैलास यांच्या आई वडील व पत्नीला हा धनादेश सुपूर्द  करण्यात आला  

8. उल्हासनगरात कारखान्याच्या गोडावुनला आग
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे प्रमुख बाळासाहेब नेटके यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना सोबत घटनास्थळी धाव घेऊन त्वरित आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.मात्र ही आग कोणत्या कारणांमुळे लागली याबाबत पोलीस शोध घेत आहेत.

 9. नाकाबंदी  असतांना परिसरात तरुणांची  हुल्लडबाजी 
सोसायटीच्या आवारात व परिसरात गर्दी करू नये असे पोलिसांकडून आव्हान करून देखील काही सोसायटीच्या परिसरात तरुन हुल्लडबाजी करतांना आढळून आले.

31 डिसेंबर च्या पार्श्वभूमीवर पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त 
बस स्थानक परिसरात रात्री उशीरा पर्यत नागरिक विनाकारण फिरत आसल्यामुळे सर्वा गाड्याची चौकशी केली खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकानी विनाकारण घरा बाहेर फिरू नाही सर्वा रात्री उशीरा पर्यत दुकाने उघडे होते सर्वो दुकाने बंद करा असे आव्हण पोलिस गाडीतुन देन्यात आले  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *