Breaking News

1/breakingnews/recent

4 जानेवारी Good Morning सह्याद्री

No comments

  News24सह्याद्री - तरुण तरुणींना नोकरीची सुवर्णसंधी....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES

1. कोरोना लस मिळविण्यासाठी 'कोविन' अ‍ॅप आवश्यक
लसीकरणासाठी सरकारने एक 'कोविन' अ‍ॅप तयार केला आहे. हा अ‍ॅप सुरुवातीपासून पूर्ण प्रक्रियेचे परीक्षण करेल. Co-Win ही इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सीन इंटेलिजेंस नेटवर्कची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे.

2. नाशिक, पुणे, औरंगाबादमधील नववी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरु
मार्च महिन्यापासून राज्यभरातील शाळा आणि महाविद्यालयं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अखेर आजपासून पुणे, नाशिक, औरंगाबाद, पालघरमध्ये शाळा सुरु होत आहेत.शाळा सुरु करण्यासाठी पालकांची लेखी संमती असणं बंधनकारक करण्यात आलं आहे

3. पुढील सात ते आठ दिवसांत पत्रीपूलाचे काम पूर्ण होईल- खा. श्रीकांत शिंदे 
 २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी या ध्वजाचे ध्वजारोहन होणार आहे. या ध्वज स्तंभाचे भूमीपूजन काल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर खासदार शिंदे यांनी येत्या सात ते आठ दिवसांत पत्रीपूलाचे काम पूर्ण होईल अशी माहिती दिली.

4. एटीएम मशीन फोडणारे चार भामटे पोलीसांच्या जाळयात
वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सर्व माहिती गोळा करुन आशेळे गावात लपुन बसलेल्या रोहीत कहार,सागर सुर्यवंशी,केशव जगताप,आशिष गौर, या चार भामट्यांना काही तासातच अटक करण्यात पोलिसांना यश आले.

5. तरुण तरुणींना सुवर्णसंधी 
 नामचीन कंपनीमध्ये बेरोजगारांना रोजगार संजय पावशे यांनी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये १५० हून अधिक तरुण तरुणींना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

6. वंचित बहुजन आघाडीने रेखाटला सावित्रीबाई फुले यांंचा देखावा 
सावित्रीमाई फुले यांनी केलेल्या संर्घषाची,त्यागाची,जाणीव महीलांमध्ये निर्माण व्हावी हा उद्देश डोळयासमोर ठेवून सदरचा देखावा रेखाटला असल्याचे मनोगत सुरेखा सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

7. गंगापूर तालुक्यातील कणकोरीत बिबट्याचे दर्शन 
पंधरा दिवसा पासुन भीतीच्या सावटा खाली असलेल्या शेतकरी जास्तच भयभीत झाले आहे. आता शेतात बिबट्या मग आम्ही जिव धोक्यात घालून शेतात जायचे कसे असा प्रश्न शेतकर्यानीं उभा करत वनविभागाने लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांकडून होत आहे.

8. सावित्रीबाई फुले महान समाजसेविका- हर्षवर्धन पाटील  
 महान समाजसेविका म्हणून सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख करावा लागेल.'  असे प्रतिपादन भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 190 व्या जयंती निमित्ताने व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते 

9. भरधाव वेगाने धावणाऱ्या स्कार्पिओने घेतला अचानक पेट   
 पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिलतकुमार बल्लाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत सुदैवाने चालकाच्या प्रसंगसावधानतेमुळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.

10. दुःखाच्या प्रसंगातही सकारात्मक विचार
प्रदूषण टाळण्यासाठी एक सकारात्मक पाऊल म्हणून संदीप कुलकर्णी आणि त्यांच्या परिवाराने एक आदर्श पद्धतीची रुजवात करुन संदीप यांनी पत्नीच्या निधनानंतर रक्षा आपल्या शेतात विसर्जित करून त्याठिकाणी वृक्षारोपण केल्याने एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *