Breaking News

1/breakingnews/recent

31 जानेवारी सह्याद्री वेगवान आढावा

No comments

   News24सह्याद्री - असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस व टीएमसीवर साधला निशाणा....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा





TOP HEADLINES


1. राज्याचा रिकव्हरी रेट ९५.२३ टक्क्यांवर
राज्यात दिवसभरात २,६३० नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. तर १५,५३५ अॅक्टिव्ह रुग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला.

2. आंदोलनाला धक्का बसेल असा निर्णय अण्णां कधीच घेणार नाहीत : मेधा पाटकर
आमच्या सारख्यांना संघटनेला विचारात घेऊनच उपोषणाचा निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे अण्णांनी देखील चर्चा करूनच उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला असेल,

3. असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस व टीएमसीवर साधला निशाणा
पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता तिथले राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस व टीएमसीवर निशाणा साधल्याचे दिसत आहे.

4. .मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील व्हिडीओवरुन भाजपा नेत्याचा सवाल
  मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर (एक्सप्रेस-वे वरील) बंदुकीचा धाक दाखवून ट्रकला ओव्हरटेक करणाऱ्या शिवसैनिकांचा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. 

5. अनंतनागमध्ये पोलिसांची मोठी कारवाई
अनंतनाग पोलिसांनी लष्कर ए मुस्तफा या नव्या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली 

6. तृणमूलच्या पाच नेत्यांचा भाजपात प्रवेश
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधीच सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला गळती लागली आहे. काही महिन्यांपासून तृणमूलचे नेते भाजपाची वाट धरताना दिसत आहेत. 

7. जूनपर्यंत ‘सीरम’ आणणार आणखी एक लस
सीरम इन्स्टिट्यूटकडून नोवाव्हॅक्स कंपनीच्या सहकार्याने आणखी एक लस भारतात लॉन्च करण्यात येणार आहे. ‘कोवोव्हॅक्स’ या स्थानिक नावाने जून २०२१ पर्यंत ही लस बाजार येईल, 

8. शिवम सहकारी बँकेचा परवाना रद्द
 इचलकरंजी येथील शिवम सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आल्यानं एकच खळबळ उडालीय. बँकेची आर्थिक स्थिती बिघडल्याने रिझर्व्ह बँकेनं ही कारवाई केलीय.

9. नांदेड, परभणीत पेट्रोल सर्वाधिक महाग
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या भावात चढ-उतार पाहायला मिळतायत. वाढते पेट्रोलचे दर सामान्यांसाठीसुद्धा डोकेदुखी ठरत आहेत. लोकल रेल्वे सर्व सामान्यांसाठी खुली नसल्यानं बऱ्याचदा नोकरदार कर्मचारी वाहनानं प्रवास करतात. 

10. पुणे जिल्ह्यातल्या गरोदर मातांना मिळणार ‘बाळंत विडा
 गरोदर महिला आणि जन्माला येणाऱ्या बाळाचे आरोग्य़ चांगले राहण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवण्यात येतात. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *