31 जानेवारी सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - घर तेथे रस्ता बनवणार - नगराध्यक्षा आदिक....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. तालुका काँग्रेसच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम
पारनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने खरेदी विक्री संघ येथे हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे बोलत होत्या.
2. शेवगाव विश्रामगृह येथे वाहन परवाना कॅम्पचे आयोजन
शेवगाव विश्रामगृह येथे वाहन परवाना कॅम्प घेण्यात आला. यावेळी मोटार वाहन निरीक्षक योगिता अभिजित राणे यांनी लायसन काढणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.
3. मर्यादीत भाविकांच्या उपस्थितीत कोरठण खंडोबा देवस्थानच्या यात्रेची सांगता
राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या वार्षिक यात्रेच्या अखेरच्या दिवशी रुढी परंपरेनूसार बेल्हे आणि ब्राह्मणवाडा येथील मानाच्या काठ्यांची शासकीय महापुजा झाली.
4. अखेर ग्रामस्थांनी रोखली जड वाहतूक
गेल्या अनेक महिन्यापासून समृद्धी महामार्गचे काम सुरु असून या मार्गावरून जड वाहतूक मोठ्याप्रमाणात सुरु असते.
5. 'सिना'चे गुरुवारपासून रब्बी आवर्तन
रब्बी पिकांसाठी येत्या चार फेब्रुवारीपासून सीना धरणातून आवर्तन सोडण्यात येणार आहे. आवर्तन 'टेल टू हेड' होणार असून हे आवर्तन वीस दिवस चालेल असा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
6. शिर्डी नगरपंचायती मधील पाच अधिकाऱ्यांना कोरोना
शिर्डी नगर पंचायतीचा कारभार हाकणाऱ्या पाच पदाधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग एकाच वेळी झाला आहे.
7. मुख्याधिकारी वसुलीसाठी मैदानात
जामखेड नगर परिषद हद्दीतील व्यावसायिक व रहिवासी यांच्याकडे मालमत्ता करापोटी साडेआठ कोटी थकीत आहेत.
8. घर तेथे रस्ता बनवणार - नगराध्यक्षा आदिक
शहरातील सर्व प्रभागांमध्ये ‘घर तेथे डांबरी रस्ता’ बनवला जाणार असून नजीकच्या काळात शहरातील सर्व रस्ते दुरूस्त करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी सांगितले. मेनरोडसह इतर रस्त्यांची दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे.
9. मुरूम तस्करांची महसूल कर्मचाऱ्यास दमदाटी
बेकायदा गौण खनिजाची वाहतूक करताना अटकाव करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यास दमदाटी करून ट्रॅक्टर घेऊन पळून जाण्याची घटना तालुक्यातील राजापूर येथे घडली.
10. मंत्री मुंडेंचा शनिदेवाला शांती अभिषेक
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी काल शनिशिंगणापूरला भेट देऊन शनी ग्रह शांती व तैलाभिषेक करीत स्वयंभू शनीमूर्तीचे दर्शन घेतले.
No comments
Post a Comment