Breaking News

1/breakingnews/recent

31 जानेवारी सह्याद्री बुलेटिन

No comments

             News24सह्याद्री - खिलार बैलाला 'इनोव्हा' एवढी किंमत!...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये



TOP HEADLINES


1. फेरीवाल्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी नगरपरिषेदला निवेदन.
परभणी जिल्ह्यातील मानवत शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या दुकानासमोरील हातगाड्यावाल्यांचे व फेरीवाल्यांचे अतिक्रमण काढण्याकरिता शहरातील व्यापाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

2. 'ते' धक्कादायक निकाल न्या. पुष्पा गणेडीवालांना भोवले; 
पोक्सो कायद्यांतर्गत बालिकांवरील लैंगिक अत्याचारासंदर्भातील दोन वादग्रस्त निर्णयांनतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांची पदावर कायम करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मागे घेतली आहे

3. पिस्तुलीचा धाक दाखवत होते ते मुळात शिवसैनिक नव्हते.  

 मुंबई-पुणे महामार्गावरील एक गाडी बंदुक दाखवून ट्रकला ओव्हरटेक करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या गाडीच्या मागच्या काचेवर शिवसेनेचे वाघाचे चिन्ह आहे.


4. 'अण्णा हजारेंना समर्थन देणं मोठी चूक':हंसल मेहता 

 शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जेष्ठ नेते अण्णा हजारे 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धीत उपोषणाला बसणार होते. 


5. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

 राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर विविध पक्षाचे नेते प्रतिक्रिया व्यक्त करू लागले आहेत.


6. कोल्हापूर, औरंगाबाद, शिर्डी विमानतळाचे नामांतर होणार?

 महाराष्ट्रातील कोल्हापूर, औरंगाबाद आणि शिर्डी या तिन्ही विमानतळांचे नामांतर होण्याची दाट शक्यता आहे. 


7. देशभरातील चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेने सुरु होणार
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने देशाभरातील सर्वच चित्रपटगृहे 1 फेब्रुवारीपासून चित्रपट गृह 100 टक्के क्षमतेसह उघडण्याची परवानगी दिली आहे.

8. लॉकडाऊनपूर्वी काढलेल्या लोकल पासला शिल्लक दिवसांची मुदतवाढ
सोमवारपासून म्हणजेच, उद्यापासून मुंबई लोकलची दारं सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. 

9. धक्कादायक ! डॉक्टरांच्या घरी काम करणाऱ्यांचे कोरोना लसीकरण
औरंगाबादेत आरोग्य कर्मचार्यांच्या नावाखाली खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या घरी काम करणाऱ्या लोकांना, मोलकरीण यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

10. खिलार बैलाला 'इनोव्हा' एवढी किंमत!
लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच सांगलीत बैल बाजार भरला आहे. त्यामुळे बैल खरेदी करण्यासाठी ग्राहकांची एकच झुंबड उडाली आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *