सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - अर्बन बँकेत तीन कोटींचा अपहार; दिलीप गांधींसह तिघांवर गुन्हा दाखल
News24सह्याद्री -
केंद्र सरकारमधील माजी राज्यमंत्री आणि भाजपाचे नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांच्याशी संबंधीत मोठी बातमी आहे. नगरमधील नावाजलेल्या नगर अर्बन को ऑरेटीव्ह बँकेत मोठा अपहार झाल्याचे आरोप अखेर खरे ठरले आहेत. तीन कोटींचा अपहार केल्याची फिर्याद नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झालीय. बँकेचे शाखाधिकारी मारुती औटी यांनी फिर्याद दाखल केली आहे.फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, अर्बन बँकेचे माजी चेअरमन दिलीप मनसुखलाल गांधी यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य आरोपी करण्यात आले आहेत. याशिवाय बँकेच्या मुख्य शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी श्री.घनश्याम अच्युत बल्लाळ, कर्जदार मे. टेरासॉफट ठेक्नॉलॉजीचे प्रोप्रायटर आशुतोष सतिष लांडगे यांनी कट रचुन,संगनमत करुन ,बॅकेस खोटे कागदपत्र तयार करुन ,बँकेच्या रकमेचा अपहार करुन ठेवीदार ,सभासद यांचा विश्वासघात केलेला आहे.
सदरील रक्कम या श्री आर बी कासार ,मे. देवी एजन्सी व मे. गिरीराल एंटरप्राइजेस,संगमनेर यांच्या खात्यात वर्ग करुन,त्यांच्या खात्याव्दारे काढून घेतली आणि बँकेत एकंदर रक्कम रूपये तीन कोटींचा अपहार केला आहे.त्यांनी स्वतच्या अधिकाराचा गैरवापर करुन अवास्तव व खोटे कर्ज मंजुर केलेले आहे .व त्याव्दारे बँकेच्या रकमेची चोरी ,अफरातफर व फसवणुक केलेली आहे.त्यामुळे वरील सर्वाविरुध्द भारतीय दंड विधान कलम ४०६,४२०,४६५,४६७,४७१व १२० ब या कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments
Post a Comment