Breaking News

1/breakingnews/recent

22 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट

No comments

      News24सह्याद्री - वीज ग्राहकांना सक्षम करण्यासाठी सरकारने उचलली महत्त्वपूर्ण पावले.......पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा




TOP HEADLINES

1. वीज ग्राहकांना सक्षम करण्यासाठी सरकारने  उचलली   महत्त्वपूर्ण पावले 

 24 तास वीज उपलब्धता वीज ग्राहकांच्या अधिकारांमध्ये समाविष्ट केली गेली आहे.   या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे वीज वितरण कंपन्यांविरूद्ध कारवाई होऊ शकते.

2. आंदोलनाला जाण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो : बच्चू कडू
"शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाण्यासाठी परवानगी दिल्याने मी सरकारचे आभार मानतो," अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यावेळी निघताना दिली.

3. मृत गाय-बैलांची कातडी बाळगणं गुन्हा नाही- मुंबई हायकोर्ट
जस्टिस व्हि. एम. देशपांडे आणि अनिल किशोर यांच्या खंडपीठाने या संदर्भातला निर्णय दिला आहे. मृत गायी किंवा बैल यांची कातडी बाळगणं हा गुन्हा नाही असं स्पष्ट केलं आहे.

4. ‘काँग्रेसला विरोधक लागत नाही’, निलेश राणेंचा टोला
 त्यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी काँग्रेसला जोरदार टोला लगावलाय. काँग्रेस पक्ष हा खो-खो सारखा असल्याची टीका निलेश राणेंनी केलीय  

5. भाजपचं हिंदुत्व म्हणजे नाटकबाजी -  राठोड 
शिवसेनेचे हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे. मात्र, काहीजण हिंदुत्वाच्या नावावर नाटकबाजी करत असल्याचे सांगत राठोड यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे टोला लगावला.  

6. मार्गशीषमुळे मांसाहार स्वस्त
त्याचा परिणाम चिकन आणि अंडीच्या दरांवर झाला असून अंडी ५० पैशांनी, ब्रॉयलर कोंबडी १० रुपये तर, गावठी कोंबडी ९० रुपयांनी स्वस्त झाली आहे. मार्गशीर्षच्या उपवासामुळे मांसाहाराचे दर घसरल्याचे चित्र आहे.  

7. जिल्हा परिषद पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
पंधरा वित्त आयोगातून मिळणाऱ्या बंधित व अबंधित निधीच्या वाटपात सत्ताधाऱ्यांनी दुजाभाव केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे या निधीवर बहिष्कार घालण्याची भूमिका विरोधी पक्ष सदस्यांनी घेतली आहे.

8. मुंबईतील ड्रॅगन फ्लाय क्लबवर कारवाई : विश्वास नांगरे पाटील
या कारवाईचं कारण समोर आलं आहे. नाईट कर्फ्यू असताना रात्री उशिरापर्यंत हा क्लब सुरु असल्याने कारवाई केल्याची माहिती मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.  

9. युकेहून आलेल्या प्रवाशांपैकी एकही पॉझिटीव्ह नाही
 माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी दिली आहे. काल रात्रीपासून युकेहून आलेल्या प्रवाशांपैकी एकही पॉझिटीव्ह व्यक्ती सापडलेली नाही  

10. पायल घोषचा मुंबई पोलिसांना संतप्त सवाल
पायलने वर्सोवा पोलिस ठाण्यात अनुराग विरोधात तक्रार देखील दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अनुरागची चौकशी केली. पण गेल्या चार महिन्यांपासून सुरु असलेल्या चौकशीवर पायलने नाराजी व्यक्त करत मुंबई पोलिसांना संतप्त सवाल केला आहे.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *