23 डिसेंबर सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - काँग्रेसने सरचिटणीसपदी निवडला भाजपाचा नेता....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
फायझर इंक आणि स्थानिक कंपनी भारत बायोटेक यांनी तयार केलेल्या लसींसाठी ही आपत्कालीन वापराच्या अधिकृतता अर्जांवर विचार सुरू आहे. त्यामुळे लवकरच भारतीयांना कोरोना लस मिळण्याची शक्यता आहे.
2. पंतप्रधान मोदी यांना ‘लिजन ऑफ मेरिट’ पुरस्कार प्रदान
भारताचे राजदूत तरणजित सिंग संधू यांनी स्वीकारला. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी हा पुरस्कार प्रदान केला.
3. अर्णब गोस्वामींना आंतरराष्ट्रीय झटका
रिपब्लिकचा युकेमधील हिंदी भाषिकांपर्यंत या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न आहे. प्रसारणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे.
4. घर खरेदी करणाऱ्यांसाठी सरकारकडून मुद्रांक शुल्कात सवलत
बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्क सवलत दिलीय. तत्पूर्वी 3 टक्के मुद्रांक शुल्क सवलत 31 डिसेंबर 2020 पर्यंत मर्यादित आहे. 5. प्रौढ स्त्रीला इच्छेनुसार लग्नाचा आणि धर्मांतराचा हक्क – हायकोर्ट
महत्वूपर्ण निर्णय कोलकाता हायकोर्टानं दिला आहे.न्या. संजीब बॅनर्जी आणि न्या. अरिजीत बॅनर्जी यांच्या खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणीदरम्यान हा निर्णय दिला आहे.6. काँग्रेसने सरचिटणीसपदी निवडला भाजपाचा नेता
पक्ष सोडून भाजपात प्रवेश केलेल्या नेत्याची युवक काँग्रेसने सरचिटणीसपदी निवड केल्यानंतर आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. यानंतर पक्षाने तात्काळ चुक दुरुस्त केली. पण तोपर्यंत उशीर झाला होता.
7. नाताळसाठी राज्य शासनाची नियमावली जाहीर; गृहमंत्र्यांचं आवाहन
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्व ख्रिस्त धर्मीयांना यंदाचा नाताळ सण हा अगदी साध्या पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.
8. राज्यभरातील महाबीज कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे
सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी 9 डिसेंबरपासून महाबीज कर्मचारी संपावर गेले होते. मात्र सरकारनं सातव्या वेतन आयोगाचे प्रत्येकी 35 हजार अग्रीम देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला.
9. मनसे अॅक्शन मोडमध्ये; ग्रामपंचायत निवडणुकांवर बैठक
पण, यावेळी ग्रामपंचायतीच्या निमित्ताने मनसे पहिल्यांदाच गावपातळीच्या राजकारणात आपली ताकद आजमावत आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्याने मनसेनी यासंदर्भात खलबतं करण्यासाठी बैठक बोलावली आहे. 10. पंकजा मुंडे यांच्या कारखान्यात चोरी
कारखान्याच्या वर्कशॉप आणि स्टोअरमधून तब्बल 37 लाख 84 हजार रुपयांचं साहित्य चोरी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी काल परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments
Post a Comment