Breaking News

1/breakingnews/recent

23 डिसेंबर सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

     News24सह्याद्री - मधुकर नवले यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी




TOP HEADLINES

1. पारनेर तालुक्यामध्ये वाळुउपसा  
अवैधरित्या वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार ज्योती देवरे यांच्या पथकाने ताब्यात घेतला आहे. डंपरमध्ये 4 ब्रास वाळू असल्याचे निष्पन्न झाले हा हायवा राजू डोंगरे यांच्या मालकीचा आहे. त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

2. मालगाडीचे १२ डबे रुळावरून घसरले
मालवाहतूक गाडीला ४२डबे होते त्यातील १२डबे रुळावर घसरले सदर घटनेबाबत बेलवंडी व श्रीगोंदा पोलिसांना माहिती मिळाली त्यानंतर पेट्रोलिंग करणाऱ्या पो उपनिरीक्षक गट,व पो कॉ प्रकाश मांडगे यांनी अपघातस्थळी धाव घेतली रेल्वेमार्ग दुरुस्त होण्यास वेळ लागणार असल्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक बऱ्याच वेळेसाठी ठप्प राहणार आहे


3. स्टेट बँक ऑफ इंडिया च्या कार्यालयात" बेटी बचाओ , बेटी पढाओ " अभियान
महाराष्ट्राच्या जनरल मॅनेजर श्रीमती सुखविंदर कौर यांचे हस्ते करण्यात आले.  तसेच यावेळी  आत्मा मालिक हॉस्पिटल व जिल्हा शासकिय रुग्णालयासाठी कोविड १९ सुरक्षा साठी पी.पी.ई. किट प्रदान करण्यात आले .

4. रयत रयत शिक्षण सौंस्थेतील शिक्षकाना अटक
 रयत सौंस्थेच्या दोन शिक्षकांसह आणखी एक अशा तीन आरोपीना दोन महिन्यानंतरही अटक करण्यात यश येत नाही त्यामुळे या गुन्ह्याचा  तपास सीआयडी कडे द्यावा अशी मागणी फसवणूक झालेल्या तक्रारदारांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे केली आहे.

5. पिंगेवाडी येथील नदीपात्रात बेकायदा वाळू उपसा  
 विशाल बदलावा यांनी मंगळवारी उपोषण करत चौकशीची मागणी केली आहे.तसेच येथी वाद्ग्रस्थ वाळू लिलावप्रकारणी महसुली कर्मचारी व अधिकारी यांचे जबाब  नोंदवल्यानंतर वरिष्ठाना अहवाल कळवनार आहेत.

 6. कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याला आत्महत्या 
घटनेची खबर जामखेड पोलिसांना मिळताच पोलिसांनी ताबडतोब घटना स्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेतला.

7. श्रीगोंद्यात महसूल   व पोलीस प्रशासनाने चांगलीच कंबर कसली .
वाळूचोरी बंद करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविणार आहेत त्यासाठी पोलिसांसोबत संयुक्त नियोजन करणार असून आपल्या काळात वाळूचोरी बंद करण्यासाठी पुढाकार घेणार आहेत.

8. अकोल्यात भाजपला भगदाड
श्रद्धेय भाऊसाहेब थोरात हेच आमचे विद्यापीठ असून मंत्री थोरात यांच्यासोबत यापूर्वीही काम केल्यामुळे स्वगृही परतल्याच आनंद झाल्याचेही नवले यांनी सांगितले.

9. गुन्यातील दारू पोलिसांनी केली नष्ट
  जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व उपाधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या आदेशाने 2020 मध्ये दाखल दारूबंदीचे  ३३गुन्ह्यांमधील दारू नष्ट करण्यात आली आहे यामध्ये देशी बरोबरच विदेशी दारू च्या 557 बाटल्या होता.

10. रुग्णालयात आर्थिक उपचार बंद असल्याने नागरिकांमध्ये नाराजी  
 सध्या श्रीरामपुरात साधारण आठ ते दहा रुग्ण सापडतात ही संख्या अतिशय कमी झाल्याने या ठिकाणी आज सुविधा पूर्ववत सुरू करावेत अशी मागणी पुढे येऊ लागली


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *