Breaking News

1/breakingnews/recent

ही लढाई फक्त मंदिर-मशिदीची नव्हती-फडणवीस

No comments



मुंबई -

फडणवीस म्हणाले की प्रभू रामचंद्र हे भारताचा आत्मा आहे. आपल्या संस्कृतीचा आत्मा प्रभू श्रीराम आहे.त्यामुळेच ती जागा आक्रमणासाठी निवडली गेली असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आपल्या संस्कृतीचा आत्मा प्रभू श्रीराम आहेत. हे मीर बांकीला ठाऊक होते. ही लढाई फक्त मंदिर-मशिदीची नव्हती. संस्कृतीवर करण्यात आलेल्या आक्रमणाचीही होती असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्याने अय़ोध्येतले मंदिर १५२८ मध्ये पाडले. तुमच्या संस्कृतीचा आत्माच आम्ही मिटवू शकतो हे त्याला दाखवून द्यायच होते. रामजन्मभूमीचे आंदोलन हे गेले अनेक शतके सुरु होते. १५२८ मध्ये बाबराचा सेनापती मीर बांकी याने अयोध्येचे मंदिर तोडून तिथे मशिद बांधण्याचा प्रयत्न केला. अयोध्येत जागा कमी होती का?  केवळ राम मंदिराला लक्ष्य केले गेले. 

कारण एखाद्या समाजाला पराजित मानसिकतेत न्यायच असेल तर त्या समाजाचा आत्मा मारावा लागतो त्यामुळे संस्कृतीवर एक प्रकारचा घाला घातला गेला असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. माधव भंडारी यांच्या अयोध्या या पुस्तकाचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रवीण दरेकर, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा आणि अन्य नेते उपस्थित होते. २२ डिसेंबरला हे प्रकाशन झाले. या दिवसाला वेगळे महत्त्व आहे. कारण २२ डिसेंबर १९४९ रोजी वादग्रस्त वास्तूत श्रीरामचंद्र यांच्या मूर्ती ठेवल्या गेल्या असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. प्रभू श्रीराम आणि प्रभू श्रीकृष्णांनी जो वारसा आपल्याला दिला आहे तो इतका समृद्ध आहे की त्या वारशाने आपल्या देशात प्रत्येकाला जागा दिली. जगाने ज्या लोकांना त्रस्त केले ते सगळे लोक भारतात आले. त्यांना भारताच्या हिंदू संस्कृतीने आपल्यामध्ये सामावून घेतले. ज्यांनी आक्रमण केले त्यांनाही सामावून घेतले. जे आश्रित आले त्यांनाही सामावून घेतले. त्यामुळे अशा समृद्ध संस्कृतीवर जो घाला घालण्यात आला होता त्याविरोधातली ही लढाई होती 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *