Breaking News

1/breakingnews/recent

30 डिसेंबर सह्याद्री वेगवान आढावा

No comments

    News24सह्याद्री - भोसरी भूखंड प्रकरणी एकनाथ खडसेंना EDची नोटीस...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES


1. शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये आज सातव्यांदा चर्चा, बैठकीकडे देशाचे लक्ष
शेतकरी संघटनांना केंद्र सरकारकडून आज चर्चेला येण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. विज्ञान भवनात आज दुपारी दोन वाजता ही चर्चा होणार आहे.  चर्चेआधीच शेतकरी संघटनांनी आपल्या मागण्या समोर ठेवल्या आहेत.

2.गुन्हेगारांमध्ये आपापसात झालेल्या संघर्षात एकाची हत्या
नागपुरात हत्यांचे सत्र काही केल्या थांबत नाही. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोनच दिवसांपूर्वी शहरात गुन्हे 15 टक्के कमी झाल्याचा दावा केला होता. मात्र, त्यानंतर नागपूरच्या वाथोडा भागात गुन्हेगारांमध्ये आपापसात झालेल्या संघर्षात एकाची हत्या झाली आहे. आकीब अब्दुल सत्तर असे मृताचे नाव असून तो ऑटो चालक होता 

3. भोसरी भूखंड प्रकरणी एकनाथ खडसेंना EDची नोटीस 
 मात्र मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ खडसे हे त्यांच्या वकीलामार्फत हजर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खडसे हे उद्या स्वतः हजर राहतात की वकीलामार्फत आपली बाजू मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.  

4. भाजप नेत्याची शरद पवारांवर टीका
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. "केंद्रानं कृषी कायदे रेटले, दिल्लीत बसून शेती करता येत नाही. पण दिल्लीत कृषीमंत्री म्हणून दहा वर्षे आयपीएल सामने मात्र भरवता येतात," असं म्हणत भातखळकर यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शरद पवारांवर निशाणा साधला.

 5. चित्रीकरण प्रत्यक्ष पाहण्याची मिळणार संधी
महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालय आणि स्टारक्राफ्ट मनोरंजन प्राईम लिमिटेड यांच्यामध्ये पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारांमुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.  

6. ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणी आता सहप्रवाशांवरही कारवाई होणार
मोटार वाहन कायद्यान्वये केवळ मद्यपी वाहनचालकच नव्हे तर, वाहनांतील सहप्रवासीसुद्धा दोषी ठरतात. त्यांच्याविरोधातही यंदा कारवाई केली जाणार असल्यामुळे कुणीही मद्यप्राशन करुन वाहन चालवू नये, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

7. संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा
 संजय राऊतांनी आक्रमक आक्रमक पवित्रा घेत निर्वाणीचा इशारा दिला आहे.आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहा, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.  

8. भारतामध्ये झपाट्यानं पसरतोय नवा कोरोना, 20 जणांना लागण
ब्रिटनमध्ये तयार झालेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूचा  आता भारतामध्येही झपाट्यानं पसरत आहे. ब्रिटनमधून देशात परतलेल्या नागरिकांपैकी 20 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. या 20 जणांपैकी 8 जण हे दिल्लीमधील आहेत.  

9. तिकीट कन्फर्म झाल्यावरच रेल्वेस्थानकात प्रवेश मिळणार
जनरल तिकिटे बंद केल्यानंतर आता आरक्षित तिकीट कन्फर्म झाल्याशिवाय संबंधित प्रवाशाला स्थानकावर प्रवेशबंदी करण्यात आली आहे.  

10. शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स आणि निफ्टी धोक्याच्या पातळीवर
सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सुरुवातीच्या काळात घसरण झाली पण नंतरच्या काळात पुन्हा शेअर बाजाराने पुन्हा उसळी खाल्ली आणि नवा विक्रम केला.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *