28 डिसेंबर सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - २८ वर्षीय पतीकडून ५१ वर्षीय पत्नीची हत्या..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. देशभरात २४ तासांत २० हजार २१ नवे करोनाबाधित
मागील २४ तासांमध्ये देशभरात २० हजार २१ नवे करोनाबाधित आढळले, तर २७९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. याशिवाय २१ हजार १३१ जण करोनामुक्त झाल्याचे देखील समोर आले आहे. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ कोटी २ लाख ७ हजार ८७१ वर पोहचली आहे.
2. RSS स्वयंसेवकाने घरात घुसून बलात्कार केला; महिलेचा आरोप
अशातच एका महिलेनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकावर बलात्काराचा आरोप केला आहे. घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवत स्वयंसेवकाने बलात्कार केल्याचा दावा महिलेनं केला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
3. काँग्रेसच्या वर्धापन दिनीच राहुल गांधी इटलीला रवाना
पक्षाच्या वर्धापन दिनाच्याच दिवशी राहुल गांधी परदेश दौऱ्यावर गेले असल्याची बाब समोर येत आहे. जे कळताच भाजप नेते गिरीराज सिंह यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं.राहुल गांधी यांची भारतातील सुट्टी संपली आहे. आता ते इटलीला परत गेले आहेत, असं म्हणत त्यांनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर निशाणा साधला.
4. ईडीची नोटीस येणं स्वस्त झालंय -
प्रफुल्ल पटेल
भारतात अनेकांना ईडीची नोटीस येत असते. त्यात काही नवीन नाही. ईडीची नोटीस येणं स्वस्त झालं असून आजकाल कुणालाही नोटीस बजावल्या जातेय, असा टोला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी लगावला आहे
5. शरद पवार यांना पाठवलेली नोटीस का मागे घेतली?; राष्ट्रवादीचा सवाल
राऊत यांच्या पत्नीला पाठवण्यात आलेल्या नोटीसीवरून राष्ट्रवादी काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “भाजपाच्या विरोधात असणाऱ्यांना सुडबुद्धीने नोटीस पाठवली जात आहे. भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे,”असा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे.
6. महिलेने पाच महिन्याच्या बाळाला जिवंत पेटवलं
मध्य प्रदेशात महिलेने आपल्या पाच महिन्यांच्या बाळाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुड्डी सिंह गोंड असं या २७ वर्षीय महिलेचं नाव असून सुखर गावात हा प्रकार घडला आहे. महिलेने आग लावून आपल्या बाळाला त्यात फेकून दिलं असं वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे
7. २८ वर्षीय पतीकडून ५१ वर्षीय पत्नीची हत्या
केरळमधील तिरुअनंतपुरम येथे २८ वर्षीय व्यक्तीने ५१ वर्षीय पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ५१ वर्षीय शखाकुमारी यांचा मृतदेह तिरुअनंतपुरम येथील परिसरात आढळला होता. प्राथमिक चौकशीदरम्यान पती अरुण याने घरात ख्रिसमच्या निमित्ताने करण्यात आलेल्या रोषणाईमुळे मृत्यू झाल्याचा दावा केला 8. नाताळ सवलत योजनांना ग्राहकांचा मोठा प्रतिसाद
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नाताळमध्ये ग्राहकांचा ७० ते ७५ टक्के अधिक प्रतिसाद मिळाल्याचे आणि विक्रीतही वाढ झाल्याचे काही मॉल व्यवस्थापकांनी सांगितले. बहुतांश मॉलमधील सवलत योजनांमुळे तयार कपडय़ांसह भेटवस्तूंना अधिक मागणी होती.
9. मेट्रो कारशेडसाठी तिसरी समिती; लवकरच अंतिम निर्णय
मेट्रो कारशेडबाबत ही तिसरी समिती ठरेल. मेट्रो कारशेड कांजूरलाच की अन्य कोणत्या जागेवर करायचे याबाबत अभ्यास करून नवी समिती सरकारला महिनाभरात अहवाल देईल. एक-दोन दिवसांत याबाबतचा शासन निर्णय होणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
10. उमेश यादव दुखापतग्रस्त, अर्ध्यातच सोडलं मैदान
मेलबर्न येथे सुरु असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांच्यानंतर उमेश यादवही दुखापतग्रस्त झाला आहे. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना उमेश यादवला हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला. त्यामुळे सामना अर्ध्यात सोडून उमेश यादवनं मैदान सोडलं.
No comments
Post a Comment