Breaking News

1/breakingnews/recent

“लाभार्थ्यांना उत्तर द्यावंच लागेल”: किरीट सोमय्या

No comments




मुंबई -

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ‘ईडी’कडून नोटीस पाठवण्यात आली आहे. अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवून २९ डिसेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे. पीएमसी गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. संजय राऊत यांनी कोणामध्ये किती जोर आहे पाहूया असे म्हणत अप्रत्यक्षपणे ईडीच्या कारवाईला आव्हान दिले आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत लाभार्थ्यांना उत्तर द्यावेच लागेल असे म्हटले आहे. वयोवृद्ध गुंतवणूकदार ते पीएमसी बँक, पीएमसी बँक ते एचडीआयएल (वाधवान बंधू), एचडीआयएल ते प्रवीण राऊत, प्रवीण राऊत ते माधूरी प्रवीण राऊत, माधूरी प्रवीण राऊत ते वर्षा  संजय राऊत…गेल्या काही महिन्यात ईडीकडून तीन नोटीस…पण उत्तर नाही…का? लाभार्थ्यांना उत्तर द्यावेच लागेल. 

संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाले. त्याबाबतचा तपशील जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस पाठवली आहे. संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. मी काही सांगत नसून सगळे भाजपाचे लोक सांगत आहे. भाजपाचे लोक मला ईडीची नोटीस आल्याच सांगत आहे. कालपासून पाहतोय अजून कोणी आलेल नाही. मी माझा माणूस भाजपाच्या कार्यालयात पाठवला आहे. कदाचित तिथे नोटीस अडकली असेल. तिथून त्यांच्या पक्षाचा माणूस निघाला असेल…तर पाहून घेऊ असा टोला त्यांनी लगावला.



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *