Breaking News

1/breakingnews/recent

26 डिसेंबर सह्याद्री वेगवान आढावा

No comments

       News24सह्याद्री - गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकऱ्यांना दिला शब्द....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES

1. गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकऱ्यांना दिला शब्द
दिल्लीतील किशनगढ येथे एका सभेला संबोधित करताना शाह यांनी सरकार शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी तयार असल्याचेही म्हटले आहे.

2. प्रकाश जावडेकरांचं राहुल गांधींना जाहीर आव्हान
नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या काही शेतकऱ्यांची त्यांच्या राजकीय गुरुंकडून दिशाभूल केली जात आहे, तसंच जणू काही संपूर्ण देशातील शेतकरी त्यांच्यासोबत आहेत असं चित्र रंगवलं जात आहे असा आरोप प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. चेन्नई येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  

3. एअरटेल इंडियाची पोलिसात तक्रार  
 एअरटेल इंडियाचे सहाय्यक नोडल अधिकार प्रथमेश मांजरेकर यांनी नुकतीच यासंदर्भात मुंबईतील समतानगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, मुंबईच्या उत्तर उपनगरांमधील 56 ठिकाणी अशाप्रकार ऑप्टिकल फायबर केबल कापून त्यांचं नुकसान करण्यात आलं आहे.

4. आर्या राजेंद्रन ठरली देशातील सर्वात तरुण महापौर 
अवघ्या २१ व्या वर्षी महापौरपदी निवड होणारी आर्या राजेंद्रन ही देशातील पहिली तरुणी ठरलीय. आर्या सीपीएम पक्षाच्या तिकीटावर मुडावनमुगल विभागातून निवडून आलीय. सीपीएमकडून आर्य राजेंद्रन हिची महापौरपदी निवड करण्यात आलीय.

5. अद्याप ईडीची नोटीस नाही - एकनाथ खडसे 
पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याप्रकरणी खडसेंना नोटीस मिळाल्याची चर्चा रंगू लागली आहे. परंतु अशी कुठलीही नोटीस मिळाली नसल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे  

6. औरंगाबाद महापालिकेत ड्रेस कोड नियम पाळण्याच्या कर्मचाऱ्यांना सुचना
महापालिकेत कमर्चर्यांसाठी ड्रेस कोड जारी केले आहेत. यात कर्मचाऱ्यांनी जीन्स टी -शर्ट  तसेच गडद रंग किंवा नक्षीदार शर्ट घालण्यास महापालिकेने बंदी केली आहे . 

7. भिवंडीत पुन्हा अग्नितांडव; दहा घरं भस्मसात
आगीचं नेमकं कारण काय आहे ते अजूनही समजू शकलं नसला तरीही मात्र या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या तात्काळ दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.  

8. नवीन वर्षात पुणे जिल्ह्यात पोस्ट कोव्हिड सेंटर्सची संख्या वाढणार
जिल्ह्यातील 9 ग्रामीण रुग्णाल आणि 5 उपजिल्हा रुग्णालयात पोस्ट कोव्हिड ओपीडी सेंटर सुरु करण्यात येणार असून आयसीयुमधून उपचार घेतलेले रुग्ण, जेष्ठ नागरिक यांच्यावर विशेष लक्ष असणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक नांदापूरकर यांनी दिली आहे. 

9. पुण्यानंतर कोल्हापुरात गव्यांच्या कळपाचे दर्शन
कोल्हापूर शहराला लागून असणाऱ्या लक्षतीर्थ वसाहत, सुतार मळा या परिसरात नागरिकांना गव्याच्या कळपाचे दर्शन झालं.  गवे कोल्हापूर शहरात घुसू नये याच्यासाठी वन विभाग आपली टीम घेऊन त्या ठिकाणी सज्ज झाले आहेत.

10. अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी मंदिरातील स्वामींचे दर्शन पुन्हा बंद
तसे आदेशहि प्रशासनाला देण्यात आले आहे. त्यानुसार 2 जानेवारीच्या मध्यरात्री पर्यंत वटवृक्ष मंदीर पुन्हा एकदा बंद करण्यात आले असल्याची माहीती मंदीर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *