Breaking News

1/breakingnews/recent

26 डिसेंबर सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

        News24सह्याद्री - टोल नाक्यावर वाहन चालकास लुटणारे आरोपी दीड तासात जेरबंद....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी




TOP HEADLINES


1. राष्ट्रीय महामार्गाचा खेळखंडोबा 
 वाहतूक कोंडी होऊन अर्धा ते एक तास वाहने उभी राहतात तसेच  अपघात होऊन अनेकांचे बळी जात असून काहींना अपंगत्व ही आले आहे हा चर्चेचा विषय आहे हे ठेकेदार कोणालाच देत नाही ठेकेदाराला राजाश्रय मिळतो का तो कोण देतोय प्रवाशांच्या जीवाशी खेळणारे समोर आले पाहिजेत अशी जनतेची मागणी आहे

2. ग्रामपंचायत निवडणुकात होणारा संघर्ष टाळावा-विखे 
 निवडणूक घेण्याची वेळ आली तर जनसेवा मंडळाकडून ती लढावी असेही विखे यांनी स्पष्ट केले येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात विखे यांनी भाजप पदाधिकारी व समर्थकांची बैठक बोलावली होती त्यावेळी ते बोलत होते

3. श्रीरामपुरात गोमांस पकडले
हवालदार अमोल गायकवाड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे आरोपी अक्रम कुरेशी नदीम कुरेशी यांच्या विरुद्ध प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

4. पिचड विरोधकांची शरद पवार यांच्याशी अगस्ती बाबत चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा केली या बैठकीत पवार यांनीही भेटीला आलेल्या शिष्टमंडळाला सबुरीचा सल्ला देत सभासदांना अगोदर विश्वासात घ्या असा सल्ला दिला आपणही वेळप्रसंगी मदत देऊ असे सूचक विधानही केले

5. प्रवरा नदीवरील पुलाच्या कामाला हिरवा कंदील
प्रशासनाने लवकरच सदर काम हाती घेत असल्याचे लेखी आश्वासन ग्रामस्थांना दिले होते त्यानुसार संबंधित पुलाच्या कामासाठी हालचालींना आता वेग आला असल्याचे दिसत आहे ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलनाला यश मिळाले असून नदीवरील पुलाच्या कामाला हिरवा कंदील मिळाला आहे

6. डिग्रस च्या उपसरपंचावर  अविश्वास ठराव दाखल 
अविनाश भिंगारदिवे व ज्ञानेश्वर भिंगारदिवे यांच्या नेतृत्वाखाली अविश्वास प्रस्ताव दाखल केला असून उपसरपंच हे पदाचा दुरुपयोग करीत असून सदस्यांना कामकाज करताना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार करतात तसेच शासकीय योजना राबवित नसल्याने गावाला विकासापासून वंचित ठेवतात मासिक मिटिंग मध्ये केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करत नसल्याने अविश्वास प्रस्ताव मंजूर केल्याचं समजले जाते

7. पांढरीपुल रस्त्यावर खड्डेच खड्डे
 हे खड्डे चुकवत प्रवास करताना वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे हा रस्ता जिल्हा ते तालुक्यात जोडणारा असल्यामुळे दळणवळण मोठ्या प्रमाणात असते या खड्ड्यांमुळे अपघातही होत आहेत संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामात लक्ष घालून या रस्त्याचे दर्जेदार काम करावे अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे

8. टोल नाक्यावर वाहन चालकास लुटणारे आरोपी दीड तासात जेरबंद
 नेतृत्वाखाली पथकाने अवघ्या दीड तासात मुद्देमालासह अटक केली आहे या टोळीतील आरोपींच्या अटकेमुळे रस्ता लूट तसेच सुपे परिसरात चोऱ्या करणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

9. हरिश्चंद्रगडावर थर्टी फर्स्टला नो एन्ट्री
हरिश्चंद्रगड रतनगड काढतात अनेक जण मोठ्या प्रमाणात गर्दी करतात रात्रभर या ठिकाणी धिंगाणा घालतात त्यामुळे येथील पर्यावरणाला हानी पोहोचते गेल्या काही वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन मागील तीन वर्षांपासून हरिश्चंद्रगड रतनगड व इतर गड-किल्ल्यांवर वन्यजीव विभागाने वर्षअखेर साजरी करण्यासाठी पर्यटकांना बंदी घातली आहे 

10. पिकांवर लष्करी अळई चा प्रादुर्भाव उपाययोजनांची गरज
 या रोगांवर उपाय योजना करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे असे निवेदन शेतकरी सेनेच्या वतीने श्रीगोंदा तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे यावेळी तालुकाप्रमुख रघुनाथ सपकाळ रमेश जठार सामाजिक कार्यकर्ते प्रमोद उजागरे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *