Breaking News

1/breakingnews/recent

अ‍ॅमेझॉनकडून राज ठाकरेंची दिलगिरी व्यक्त: खळखट्याकनंतर बॅकफूटवर

No comments


मुंबई -

अ‍ॅमेझॉनकडून राज ठाकरेंची दिलगिरी व्यक्त केल्याचा दावाही अखिल चित्रे यांनी केला आहे. मराठीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अ‍ॅमेझॉन बॅकफूटवर गेले आहे. अ‍ॅमेझॉनने आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करण्याच आश्वासन दिले असल्याची माहिती मनसे नेते अखिल चित्रे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. ज्याप्रकारे त्यांनी आपल्या वेब पेजवर किंवा मोबाइल अ‍ॅपवर भाषा निवडताना मराठी लवकरच आणत आहोत आणि आपण क्षमस्व आहोत असे त्यांनी टाकले आहे. मराठीद्वेष दाखवला तेव्हाच आम्ही मनसैनिक अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीच पाणी पाजणार असे सांगितले होते. 

त्याचप्रकारे शुक्रवारी काही फटाके फुटले आणि अ‍ॅमेझॉन प्रशासन खडबडून जागे झाले. मराठी नाय तर अ‍ॅमेझॉन नाय’,मनसे कार्यकर्त्यांनी फोडलं अ‍ॅमेझॉनचे कार्यालय पुढे ते म्हणाले की राज ठाकरे आमचे सचिव पदाधिकारी यांना नोटीस पाठवल्यानंतर माफी मागावी अशी आमची पहिली अट होती. त्यानुसार त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. ५ तारखेला सर्व केसेस ते रद्द करणार आहे. मराठीच्या मुद्द्यावरुन मनसे प्रचंड आक्रमक झाली असून राज्यभरात अ‍ॅमेझॉनची कार्यालय फोडली. मनसे कार्यकर्त्यांनी पुणे, मुंबई आणि वसईमधील अ‍ॅमेझॉनच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. ‘मराठी नाय तर अ‍ॅमेझॉन नाय’ अशी घोषणाबाजी मनसैनिकांकडून करण्यात आली.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *