Breaking News

1/breakingnews/recent

24 डिसेंबर सह्याद्री वेगवान आढावा

No comments

     News24सह्याद्री - राज्य सरकारच्या भूमिकेत गडबड - खा. संभाजीराजे भोसले....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES

1. न्युमोनियावरील पहिली भारतीय लस तयार
 केंद्राकडून या लसीबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतरच ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ही लस सद्यस्थितीला देशात वापरात असणाऱ्या अनेक परदेशी लसींच्या तुलनेनं कमी दरात उपलब्ध होईल.  

2. ममतांचा भाजपाला इशारा
 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लबोल केला होता. अखेर ममता बॅनर्जी यांनीही भाजपाला प्रत्युत्तर देत पश्चिम बंगालचा गुजरात होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे.  

 3. भाजप मंत्र्याचं वादग्रस्त विधान
उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमधील संसदीय कार्य राज्यमंत्री आनंद स्वरुप शुक्ला यांनी हे वादग्रस्त विधान केलं असून यापूर्वीही त्यांनी अशी विधानं केली आहेत.

4. घसरलेल्या जीडीपीवरून सेनेची मोदी सरकारवर बोचरी टीका
 या मुद्द्याकडे लक्ष वेधत शिवसेनेनं केंद्र सरकारवर बोचरी टीका केली आहे. शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.

5. आशिष शेलारांनी उपस्थित केली शंका
काँग्रेसने घेतलेल्या आक्षेपामुळे तो मंजुर होऊ शकला नाही. त्यावरून भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी शंका उपस्थित केली आहे.  

6. राज्य सरकारच्या भूमिकेत गडबड - खा. संभाजीराजे भोसले
 EWS आरक्षणाला माझा विरोध नाही, पण याचा धोका SEBC ला होणार नाही, याची हमी सरकार घेणार का? असा सवालही संभाजीराजे यांनी केलाय. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आता 25 जानेवारीला सुनावणी होणार आहे.  

7. साखरसम्राट रत्नाकर गुट्टेंवर ईडीची मोठी कारवाई
 ६३५ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीने दिली आहे.  
वाहन चालकांना मुंबई पोलिसांचा इशारा

8. वाहन चालकांना मुंबई पोलिसांचा इशारा
 संचारबंदीच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी मुंबई पोलिसही सज्ज आहेत. रात्री एखादी व्यक्ती विनाकारण वाहन फिरवताना आढळल्यास मुंबई पोलिसांकडून त्या व्यक्तीचं वाहन जप्त केलं जाणार आहे.  

9. अंबाबाई मंदिरात भक्तांकडून भरभरून दान
यामध्ये अंबाबाई देवस्थानला भक्तांकडून भरभरून दान करण्यात आल्याची माहिती समोर आली. 2019- 20 या आर्थिक वर्षात तब्बल 83 लाख रुपये किंमतीचे दागिने भक्तांनी दान केल्याचं या मोजणीतून उघड झालं

10. बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा आज
 आजच्या या सभेत दोन नवीन संघांना आयपीएलमध्ये सहभागी करणं, भारतात जागतिक स्पर्धांवरील टॅक्सबाबत आयसीसीची मागणी आणि विविध क्रिकेट समित्यांच्या नियुक्त्या असे महत्वाचे मुद्दे अजेंड्यावर आहेत.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *