Breaking News

1/breakingnews/recent

24 डिसेंबर सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

      News24सह्याद्री - पोलीस ॲक्शन मोडवर; वाळू तस्करांवर कारवाई सुरू....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी





TOP HEADLINES


1. तालुक्यातील कारखान्यांकडून शेतकऱ्यांना मिळणार ऊसाचे पेमेंट
 त्यामुळे भोस यांच्या पाठपुरव्याला काही प्रमाणात यश आले असून . श्रीगोंदा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

2. शनी शिंगणापूर देवस्थानाचे विश्वस्त जाहीर
 यात अकरा विश्वस्तांच्या निवडीची घोषणा सहायक धर्मदाय आयुक्त हिरा शेळके यांनी काल केली. मुलाखतीद्वारे या अकरा विश्वस्तांची निवड करण्यात अली असून अध्यक्षपदासाठी लवकरच बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

3. २९ वर्षीय तरुणाचे अपहरण करून लुटले
 त्या सदरच्या युवकाने न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ४ जणांविरोधात विरोधात जामखेड पोलीस स्टेशनमद्धे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4. जैन मंदिरात चोरी
 यात सुमारे २ लाख २६ हजार रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याचे समजते याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिराचे ट्रस्टी अमित गांधी यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

5. हातभट्टी चालकावर गुन्हा दाखल
 या कारवाईत रोख रकमेसह मुद्देमाल हस्तगत करून पाच जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

6. शहरात मुख्य बाजापेठेत वाहतूक कोंडी  
 यात बदल होण्यासाठी पालिका प्रशासनाणे गांभीर्याने दाखल घेण्याची गरज आहे अन्यथा  तालुका व परिसरातील मुख्य बाजारपेठ मोडकळीस येण्यास वेळ लागणार नाही असं नागरिकांच म्हणणं आहे.
  
7. पोलीस ॲक्शन मोडवर; वाळू तस्करांवर कारवाई सुरू
 नुकतेच संगमनेर मुळा नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या वाळू उपसा करून वाहतूक करणारा डंपर घारगाव पोलिसांनी पकडला. याप्रकरणी एक जणांविरुद्ध घारगाव  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून १५ लाख रुपयांचा डंपर व 20 हजार रुपयांची  वाळू असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला

8. रस्त्यावर बाजार, कोट्यवधींची इमारत धूळ खात पडून
ओट्यासाठी असणारी अनामत रक्कम व ओट्यांची उंची जास्त असल्याने भाजी विक्रेते मंडईत बसायला तयार नाहीत. इमारत उपलबध असतानाही पालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील रस्त्यांवर भरणारा भाजीबाजार नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे

9. वाहतूक पोलिसांची गचांडी पकडणाऱ्या तिघांना अटक
 शहरातील शिवाजी चौकात हि घटना घडली असून हवालदार रवींद्र कोकणे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपीना शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

10. नगर मनमाड महामार्ग दुरुस्तीचे आश्वासन विरले हवेत
परंतु प्रशासनास मात्र याकडे कानाडोळा करत आहे .कोल्हार खुर्द ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर ग्रामपंचायतीला केवळ आश्वासन देण्यात आले

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *