Breaking News

1/breakingnews/recent

27 डिसेंबर सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

    News24सह्याद्री - नेवासा देवगडकडे जाणारे रस्ते दोन दिवस बंद राहणार...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी


TOP HEADLINES

1. कोविड रुग्णांच्या सानिध्यात नाताळ सण साजरा

आरोळे कोविड केअर सेंटर जामखेड तालुक्यातील कोरूना रुग्णांची मोफत सेवा करत आहे या महामार्गामुळे दीड हजारांच्या वर कुटुंबातील झालेले असताना नाताळ सण आनंदात साजरा करणे आम्हाला शक्य नाही त्यामुळे या वर्षीचा नाताळ कोविड रुग्णांच्या सानिध्यात साध्या पद्धतीने साजरा करण्यात आम्हाला आनंद आहे असे आरोळे कोविड सेंटरचे संचालक रवी आरोळे यांनी सांगितले

2. कृषी उप आयुक्तांकडून गावरान बियाणे प्रकल्पांची पाहणी

अकोले तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये सुरू असलेल्या गावरान बियाणे संवर्धन व वृद्धी प्रकल्पाला राज्याचे कृषी उपायुक्त विनय कुमार आवटे यांनी भेट देऊन पाहणी केली पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या गावरान बियाणे बँकेचे पाहणी केल्यानंतर उपायुक्त आवटे यांनी या प्रकल्पाच्या विकासासंदर्भात सूचना केल्या यावेळी तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी त्रंबकेश्वर चे तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे कृषी पर्यवेक्षक सुरेश पोखरकर इतर मान्यवरांचीही  उपस्थिती होती

3. जामखेड लग्न समारंभातून नऊ तोळे सोन्याचे दागिने लंपास

लग्नसमारंभात नवरदेवाच्या पारण्याची मिरवणूक पाहत असताना एका च्या हातातील कापडी पिशवी नजर चुकून ब्लेडच्या साह्याने कापून पिशवीतील साडेचार लाखांचे 9 तोळे सोने लंपास केले याबाबत निलेश उद्धव राव देशमुख यांनी जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे

4. नेवासा देवगड कडे जाणारे रस्ते दोन दिवस बंद राहणार

श्रीक्षेत्र देवगड येथील दत्त जयंतीनिमित्त होणारी गर्दी टाळण्यासाठी मंगळवार बुधवार असे दोन दिवस देवगड कडे जाणारे रस्ते बंद ठेवले जाणार आहेत असा निर्णय श्री दत्त मंदिर देवगड संस्थान घेतल्याची माहिती महंत भास्करगिरी महाराज यांनी दिलेली करणामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने घालण्यात आलेली आहेत

5. गटविकास अधिकाऱ्यांची फेसबुक खाते केले क्लोन

सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटे खाते सुरू करून त्याद्वारे मित्रमंडळी ओळखीच्या व्यक्ती व नातेवाईक यांना संदेश पाठवून पैसे लुटण्याचे प्रकार समोर येत आहेत संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांचे फेसबुकचे खाते क्लोन म्हणजेच बनावट खाते तयार करीत त्याद्वारे अनेकांकडे पैशाची मागणी करण्यात आली होती याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार केली असे शिंदे यांनी सांगितले तसेच माझे सुरेश शिंदे या नावाने सेम प्रोफाइलचा वापर करून खोटे फेसबुक खाते उघडले असून खोट्या खाद्या द्वारे अनेकांकडे पैशाची मागणी केली जात आहे कृपया कोणीही या मेसेजला उत्तर देऊ नये अशी पोस्ट ही शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत खात्याद्वारे केली आहे.

6. मिसिंग चा गांभीर्याने तपास करावा लागेल-सुबोध कुमार जयस्वाल 

महिला गायब होण्याच्या घटनांचा पोलिसांना गांभीर्याने तपास करावा लागेल शिर्डीतून गायब झालेल्या इंदूर येथील महिला दीप्ती सोनियांचा साडेतीन वर्षानंतर शोध लागला या घटनेबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून तपास सुरू आहे अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली

7. श्रीगोंदा साजन शुगरच्या दरात आघाडी

तालुक्यात दोन महिन्यांपासून सुरू असणाऱ्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आणि आता जोर पकडला आहे आजच खेड तालुक्यातील तिन्ही कारखान्यांनी जवळपास पावणे सात लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे गाळपात नागवडे कारखान्यांनी आघाडी घेतली मात्र दरात पैठण येथील साजन शुगरने दरात आघाडी घेताना पहिला हप्ता 2300 रुपये प्रति टन आणि काढला आहे कोणत्या म्हणजे काय

8. नगर पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसची बैठक

आगामी अकोले नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची पूर्वतयारी पैठण येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत व नगरपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजत असताना अकोलेत पक्षाची ताकद वाढविण्यासाठी व तालुक्यातील काँग्रेसला बळकटी देण्यासाठी पूर्वतयारी म्हणून बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं

9. अतिक्रमणावर उद्या हातोडा

शहरातील बाजार तळ अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून बाजार तळाचा वधु मारलेला श्वास मोकळा करण्यासाठी नगरपालिका सोमवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविणार आहे याबाबत नगरपालिकेने केलेले पोलिस विभागाकडे संरक्षणाची मागणी केली आहे

10. श्रीरामपूर पालिकेला गणेश शिंदे नवे मुख्याधिकारी

श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांची नुकतीच ठाणे महापालिकेच्या उपायुक्त पदावर बढती झाली आहे. त्यांच्या जागेवर अक्कलकोट येथून गणेश शिंदे बदलून आले असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. नूतन मुख्याधिकारी शिंदे यांच्याकडून शहरातील प्रलंबित प्रश्न सुटणार का; अन्यथा स्थानिक परिस्थिती जाणून घेण्यापूर्वीच त्यांची पुन्हा नेहमीप्रमाणे बदली होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, श्रीरामपूर नगर परिषदेचे नवे मुख्याधिकारी आगामी काळात कोणते निर्णय घेतात, तसेच ती कोणती कामे मार्गी लावतात, याकडे श्रीरामपूर शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *