27 डिसेंबर सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - अनिल अंबानींना मोठा झटका..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. देशात सहा महिन्यानंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्णसंख्या २० हजारांपेक्षा कमी
वर्षाच्या सुरूवातीलाच करोनानं देशात शिरकाव केला. त्यानंतर पूर्ण वर्ष करोनाच्या मगरमिठीत गेलं. पण, आता वर्ष मावळतीकडे झुकलेलं असताना देशातील करोनाचा प्रसार आटोक्यात येताना दिसत आहे. तब्बल सहा महिन्यानंतर देशवासीयांना दिलासा मिळणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात मागील २४ तासात २० हजारांपेक्षाही कमी करोना रुग्ण आढळून आले आहेत.
-------
2. भाजपनं गेम केल्यानं नितीश नाराज
4. अनिल अंबानींना मोठा झटका बिहारमध्ये संयुक्त जनता दलासोबत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षानं अरुणाचल प्रदेशमध्ये संयुक्त जनता दलाला (जेडीयू) धक्का दिला. जेडीयूचे सातपैकी सहा आमदार भाजपनं फोडले. त्यामुळे जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार अतिशय नाराज असल्याचं समजतं. या पार्श्वभूमीवर आज जेडीयूची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. त्यामध्ये भाजपला धक्का देण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
-------------
3. देशात पहिल्या टप्प्यात ५१ लाख लोकांचे होणार लसीकरण
कोरोनाची लस ही पहिल्या टप्प्यात राजधानी दिल्लीमधील ५१ लाख लोकांना दिली जाणार आहे. जवळपास एक हजार लसीकरणाचे केंद्र यासाठी तयार केले जाणार आहेत. ही केंद्र दिल्लीतील ४८ सरकारी आणि १०० खासगी रुग्णालयात तयार केली जातील. कोल्ड चेनची व्यवस्था लसीकरण केंद्रावर असेल. यासोबतच प्रत्येक विभागातील क्लिनिक्समध्येही लसीकरण केंद्र तयार केले जातील. दिल्लीत लसीकरणाची तयारी सध्या जोरात सुरू आहे. डझनभर खासगी रुग्णालयांमधील ६०० आरोग्य सेवा तज्ज्ञांसह ३५०० लोकांना यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे.
------------
आधीच कठीण काळातून मार्गक्रमण करत असलेल्या अनिल अंबानी यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. स्टेट बँक ऑफ इंडियासह देशातील 3 प्रमुख बँकांनी अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या बँक खात्यांना फ्रॉड करार दिला आहे. SBI सह यूनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओवरसीज बँकेनं RCOM फ्रॉड म्हटलंय. SBI आणि यूनियन बँक ऑफ इंडियानं रिलायन्स टेलिकॉम लिमिटेडलाही फ्रॉड करार दिला आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम निर्मिती मंडळाने बालभारती अभ्यासक्रम निर्मितीसाठी नेमलेल्या विषय समित्या आणि अभ्यास गट बरखास्त केले आहेत. या समित्या आणि अभ्यास गट भाजप सरकारच्या काळात तयार करण्यात आले होते. दरम्यान त्याजागी नव्याने नेमल्या जाणाऱ्या अभ्यास मंडळांमध्ये विद्यमान सरकारशी संबंधित सदस्यांचा समावेश केला जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, विषय समित्या आणि अभ्यास गट बरखास्त करण्यात आल्याचे पत्र संचालक दिनकर पाटील यांनी संबंधित सदस्यांना पाठवले आहे. ---------
5. 'रोखठोक' सदरातून शिवसेनेची केंद्राच्या राजकारणावर टीका
देशात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरलं आहे. करोना, लॉकडाउनमुळे ओढवलेलं आर्थिक संकट आणि दुसरीकडे सुरू असलेल्या राजकारणावर बोट ठेवत राऊत यांनी मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “नवीन वर्षात कोणती फळे मिळतील त्याचा भरवसा नाही. लोकांनी एकच करावे, आपले कुटुंब कसे वाचवता येईल ते पाहावे. बाकी देश सांभाळायला मोदी व त्यांचे दोन-चार लोक आहेत,” अशी टीका राऊत यांनी केली आहे.
---------
6. प्रियकराने प्रेयसीला भर चौकात जिवंत जाळले
प्रेमीयुगुलात टोकाचा वाद होऊन प्रियकराने आपल्या विवाहित प्रेयसीला जिवंत जाळल्याच्या घटनेनं नागपूर हादरलं आहे. ही भयंकर घटना अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. प्रियकर दुचाकीवर निघून गेल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी हे दृश्य बघून घटनास्थळी धाव घेतली. आग विझवून शबाना यांना खासगी रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. सदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या
---------
7. बालभारतीत नव्या नियुक्त्या------------
8. रावेर येथील पंचायत समितीचे सभापती, उपसभापती राजीनामे देणार रावेर येथील पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती राजीनामे देणार आहेत. त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने भाजप त्यांचे राजीनामे घेणार आहे. दरम्यान, सभापती आणि उपसभापती यांनी राजीनामे दिल्यानंतर या पदांसाठी कुणाची नावं समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-----------
9. पगार मिळत नसल्याने मोनो रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचे हालपगार मिळत नसल्यामुळे मोनो रेलच्या कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. वेळेवर पगार मिळत नसल्यामुळे त्यांना उधारीवर आपला प्रपंच चालवण्याची वेळ आली आहे. तसेच, मागील तीन महिन्यांपासून साप्ताहिक सुटी घेतल्याने पगारात कपात करत असल्याचीही माहिती समोर आली आहे.
---------
10. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज- अजित पवार
नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय. कोविड-19 व्यवस्थापनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. यावेळी अजित पवार बोलत होते.
No comments
Post a Comment