शहराची खबरबात - इंग्लंडवरून आलेल्या प्रवाशांत शहरातील एक जण कोरोना पॉझिटिव्ह
News24सह्याद्री - इंग्लंडवरून आलेल्या प्रवाशांत शहरातील एक जण कोरोना पॉझिटिव्ह...पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES
1. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत पाठपुरावा करणार - सुधीर तांबे
जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न दीर्घकाळापासून शासन दरबारी प्रलंबित आहेत. या सर्व प्रश्नांची तातडीने सोडवणूक होणे गरजेचे आहे .यासाठी लवकरच ग्रामविकास मंत्री तसेच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या समवेत बैठक घेऊन पाठपुरावा करू असे आश्वासन आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेने याबाबत आमदार तांबे यांना निवेदन दिले
---------
2. शिक्षक बँक निवडणूक बिनविरोध करून बक्षीस मिळवा - टेमकर
जिल्ह्यातील शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केलेले आहे. सध्या सगळीकडे बिनविरोध निवडणुकीचे वारे सुरू आहे. तेव्हा शिक्षक बँकेची निवडणूक सुद्धा बिनविरोध झाली, तर शिक्षकांचे पगार लवकर करण्यात येतील, सुट्या जादा देण्यात येतील, नियमित पगारासाठी प्रशासन सहकार्य करील. तेव्हा सर्व शिक्षक संघटनांनी याचा विचार करावा, असे मिश्किल आवाहन राज्याचे शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी केले. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांची शिक्षण उपसंचालक म्हणून बढती व बदली झाल्याबद्दल त्यांचा सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने शिक्षक बँकेच्या भा. दा. पाटील सभागृहांमध्ये सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
----------
3. इंग्लंडवरून आलेल्या प्रवाशांत शहरातील एक जण कोरोना पॉझिटिव्ह
इंग्लंडमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे भारतासह सर्वच देशाची चिंता वाढली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात 25 नोव्हेंबरपासून इंग्लंडहून किती प्रवासी आले याचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. जिल्ह्यात आलेल्या 25 प्रवाशांपैकी 20 जणांचा कोरूना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे तर ह्यात अहमदनगर मधील एकाचा अहवाल पॉझिटिव आलाय.
----------
5. तर ओबीसींची स्वतंत्र जनगणना - विजय वडेट्टीवार
ओबीसींची जनगणना करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. मात्र केंद्राने ही मागणी स्वीकारली नाही तर राज्य स्वतंत्रपणे ओबीसींची जनगणना करेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे . मुख्यमंत्र्यांनी ओबीसींसाठी चांगले निर्णय घेतले आहेत. ओबीसींची जनगणना झाली तर ज्यांची संख्या भारी त्याचा हिस्सा भारी असे समीकरण निर्माण होईल असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलाय. नगर येथील टिळक रोडवरील मंगल कार्यालयात जयंती मेळावा झाला या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते

-------
6. वर्धापनदिनी भाकपचा विजयी जल्लोष
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा 95 वा वर्धापन दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कॉम्रेड आर्या राजेंद्रन ही देशातील सर्वात कमी वयाची युवती महापौर झाल्याबद्दल बुरूडगाव रोड येथील भाकपच्या पक्ष कार्यालयासमोर फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला.

No comments
Post a Comment